advertisement

Coconut Water vs Sugarcane Juice : उन्हात नारळ पाणी की उसाचा रस? शरीर थंड ठेवण्यासाठी नक्की बेस्ट काय? हे प्रत्येकाला माहित पाहिजे

Last Updated:
आरोग्याच्या दृष्टीने या दोघांपैकी 'नंबर वन' कोण? किंवा चांगला कोण असा प्रश्न नेहमीच उभा रहातो. एकीकडे नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सचा खजिना आहे, तर दुसरीकडे उसाचा रस हा 'इन्स्टंट एनर्जी'चा पॉवर हाऊस. तुमच्या शरीरासाठी नक्की काय फायदेशीर ठरेल? चला, या दोन्ही पेयांचे गुणदोष आणि तज्ज्ञांचे मत सविस्तर जाणून घेऊया.
1/6
मार्च महिना संपत आला आहे आणि एप्रिलच्या कडक उन्हाची चाहूल आतापासूनच लागली आहे. दुपारी घराबाहेर पडलं की अंगाची लाहीलाही होते आणि गळा सुकू लागतो. अशा वेळी रस्त्याच्या कडेला लावलेले हिरव्या शहाळ्यांचे ढिगारे आणि दुसरीकडे उसाच्या रसाला पाहून आपल्याला रेफ्रेशमेंट म्हणून तो पिण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ही दोन्ही नैसर्गिक पेये जगप्रसिद्ध आहेत.

2/6
पण, आरोग्याच्या दृष्टीने या दोघांपैकी 'नंबर वन' कोण? किंवा चांगला कोण असा प्रश्न नेहमीच उभा रहातो. एकीकडे नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सचा खजिना आहे, तर दुसरीकडे उसाचा रस हा 'इन्स्टंट एनर्जी'चा पॉवर हाऊस. तुमच्या शरीरासाठी नक्की काय फायदेशीर ठरेल? चला, या दोन्ही पेयांचे गुणदोष आणि तज्ज्ञांचे मत सविस्तर जाणून घेऊया.

3/6
उसाचा रस: उर्जेचा नैसर्गिक स्रोतजेव्हा उन्हामुळे प्रचंड थकवा जाणवतो आणि चक्कर आल्यासारखं वाटतं, तेव्हा उसाचा रस हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. यात नैसर्गिक शर्करा असते, जी शरीरात जाताच तुम्हाला ताजेतवाने करते. उसाचा रस कावीळ (Jaundice) सारख्या आजारात लिव्हरला सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी उसाचा रस फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे उन्हाळ्यातील संसर्गापासून (Infections) आपला बचाव करतात.

4/6
नारळ पाणी: निसर्गाचे 'इलेक्ट्रोलाईट' ड्रिंकउन्हात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर नारळ पाणी एखाद्या औषधासारखे काम करते.
नारळ पाण्यात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते, ज्यामुळे 'डिहायड्रेशन'चा धोका टळतो.
यात कॅलरीज खूप कमी असतात. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
ज्यांना उच्च रक्तदाब किंवा पोटातील जळजळीचा (Acidity) त्रास आहे, त्यांच्यासाठी नारळ पाणी हे अमृतासमान आहे.
नारळ पाणी: निसर्गाचे 'इलेक्ट्रोलाईट' ड्रिंकउन्हात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर नारळ पाणी एखाद्या औषधासारखे काम करते.नारळ पाण्यात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते, ज्यामुळे 'डिहायड्रेशन'चा धोका टळतो.यात कॅलरीज खूप कमी असतात. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.ज्यांना उच्च रक्तदाब किंवा पोटातील जळजळीचा (Acidity) त्रास आहे, त्यांच्यासाठी नारळ पाणी हे अमृतासमान आहे.
advertisement
5/6
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दोन्ही पेये आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. जर तुम्हाला झटपट उर्जा हवी असेल तर उसाचा रस प्या आणि जर तुम्हाला शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकवून ठेवायचे असेल तर नारळ पाण्याचा पर्याय निवडा. तुम्ही ही दोन्ही पेये अदलून-बदलूनही पिऊ शकता.

6/6
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement