बीडच्या परळी येथील स्वप्नपूर्ती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी मागील वर्षभरात वाल्मिक कराड प्रकरणापासून ते कृषी खात्याची प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यावर धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं.
"नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल. जे त्याकरिता महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते, शेवटी मला वाटलं आपल्यामध्ये काहीतरी नक्कीच आहे, त्याशिवाय संपवायला निघाले' असं धनंजय मुंडे म्हणाले.
advertisement
तसंच, "त्यांना असं वाटत असावं हा बाबा आपल्याला पुरून उरला, तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूबचे चॅनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेनं महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला' असं म्हणत धनंजय मुंडेंनी विरोधकांना टोला लगावला.
विशेष म्हणजे, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे टीका केली होती. एवढंच नाहीतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
