TRENDING:

IPL 2026 : ना सूर्या-ना पांड्या,एकही ODI न खेळलेला खेळाडू मुंबईचा मॅचविनर ठरणार, इरफानची भविष्यवाणी

Last Updated:
मुंबई इंडियन्सने याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.यावेळेस त्यांना सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
advertisement
1/9
ना सूर्या-ना पांड्या,एकही ODI न खेळलेला खेळाडू मुंबईचा मॅचविनर ठरणार, इरफानची भविष्यवाणी
येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.
advertisement
2/9
तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता विरूद्ध खेळवला जाणार आहे.हा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळवला जाणार आहे. या सामन्यांची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/9
मुंबई इंडियन्सने याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.यावेळेस त्यांना सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
advertisement
4/9
दरम्यान मुंबईत असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या एकाकी खेळीच्या बळावर सामन्याचा निकाल फिरवू शकतात. या खेळाडूंमध्ये अनेकांची नावे येतात. पण टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडू इरफान पठाणने तीन नाव घेतली आहे. यातल्या दोन नावावर कुणाची काहीच शंका नसणार आहे.पण तिच सरप्राईजिंग असणार आहे.
advertisement
5/9
टी20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह उत्कृष्ट गोलंदाजी करून आला आहे. त्याच्या चार ओव्हर सामन्याचा निकाल कसा पालटतात हे आपण वर्ल्ड कपमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे तो सामना कोणत्याही क्षणी फिरवू शकतो,असे इरफान पठाणने म्हटले आहे.
advertisement
6/9
इरफान पठाणने दुसरं नाव रोहित शर्माच घेतलं आहे.रोहित शर्माची मागच्या हंगामात बॅट चालली नव्हती. पण यंदाच्या हंगामात त्याची बॅट चालेल कारण तो चांगला फिट झाला आहे आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
advertisement
7/9
इरफान पठाणने जे तिसऱ्या खेळाडूच नाव घेतले तु खूपच सरप्राईजिंग होतं. तो सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा सारख्या वर्ल्ड कप गाजवून आलेल्या खेळाडूंच नाव घेऊ शकला असता पण त्याने एका नवख्या खेळाडूचे नाव घेतले आहे.
advertisement
8/9
इरफान पठाणने मयंक मार्कंडेयच नाव घेतलं आहे. मयंक मार्कंडेय आयपीएल डेब्यू हा मुंबई इंडियन्सच्या संघातून झाला होता.त्यानंतर तो इतर संघातून खेळला.आता यंदाच्या हंगामात त्याची एन्ट्री पुन्हा मुंबईच्या संघात झाली आहे.
advertisement
9/9
मयंक मार्कंडेय हा लेग स्पिनर गोलंदाज आहे.त्याने त्याच्या गोलंदाजीत चांगला सुधार केला आहे.त्यामुळे हा गोलंदाज जर चालला तर प्रतिस्पर्ध्यांचे काही खर नाही,असे इरफान पठाणला वाटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ना सूर्या-ना पांड्या,एकही ODI न खेळलेला खेळाडू मुंबईचा मॅचविनर ठरणार, इरफानची भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल