TRENDING:

स्मृती-पलाश एकत्र येणार? लग्न मोडण्याच्या 4 महिन्यानंतर असं काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सगळंच सांगितलं

Last Updated:
Will Smriti-Palash get back together: स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडून तब्बल ४ महिने झाले असले, तरीही या लग्नाबाबत चर्चा होते. अशातच एका अभिनेत्रीने लवकरच स्मृती आणि पलाश एकत्र येतील, असं म्हटलं आहे.
advertisement
1/9
स्मृती-पलाश एकत्र येणार? लग्न मोडण्याच्या 4 महिन्यानंतर असं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना तिच्या खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचं बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होतं. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशीच त्यांचं लग्न मोडलं.
advertisement
2/9
हे लग्न मोडून तब्बल ४ महिने झाले असले, तरीही या लग्नाबाबत चर्चा होते. अशातच एका अभिनेत्रीने लवकरच स्मृती आणि पलाश एकत्र येतील, असं म्हटलं आहे.
advertisement
3/9
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात २५ तारखेला सांगलीमध्ये स्मृती आणि पलाश यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. लग्नाआधीचे सोहळे, लग्नाच्या विधी यांची सर्व तयारी झाली होती, मात्र लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांचं लग्न रद्द करण्यात आलं.
advertisement
4/9
स्मृती आणि पलाश यांच्यात नेमकं काय घडलं याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण सोशल मीडियावर पलाशवर स्मृतीला चीट करण्याचे आरोप करण्यात आले होते. याच वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये दरी निर्माण झाली आणि अखेर दोघांनीही सोशल मीडियावरून विभक्त झाल्याचं जाहीर केलं.
advertisement
5/9
या दोघांच्या नात्यात नेमकं काय घडलं, यावरून अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहने या विषयावर उघडपणे भाष्य केलं असून, या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी आशा व्यक्त केली आहे.
advertisement
6/9
पलाश मुच्छल आणि डेझी शाह सध्या एकत्र काम करत आहेत. पलाशच्या आगामी चित्रपटात डेझी काम करतेय. यासाठी पलाशने डेझीला थेट कॉल न करता इतर लोकांच्या माध्यमातून संपर्क साधला होता.
advertisement
7/9
डेझी म्हणाली, "पलाशची बहीण पलक ही माझी मैत्रीण आहे. तरीही त्याने मला डायरेक्ट मेसेज केला नाही. जेव्हा मी त्याला याबाबत विचारलं, तेव्हा तो म्हणाला की सध्याच्या वादामुळे मी कोणालाही वैयक्तिक फोन करत नाही. कारण याचाही वेगळा अर्थ काढला जाईल."
advertisement
8/9
पलाशसोबत काम करण्याबाबत डेझी म्हणाली, "प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. खरं काय आहे हे फक्त त्या दोन कुटुंबांनाच माहीत आहे. आपण मीडियामधून ऐकलेल्या गोष्टींवरून कोणालाही जज करू शकत नाही. मी कोणाचीही बाजू घेत नाही, पण पलाशने मला प्रोफेशनल कामासाठी विचारलं आणि मी फक्त माझं काम करतेय."
advertisement
9/9
डेझीने या वादाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक इच्छाही व्यक्त केली. ती म्हणाली, "मला मनापासून वाटतं की दोन्ही बाजूच्या गोष्टी निवळतील आणि ते पुन्हा एकदा एकत्र येतील. कारण ते दोघं एकत्र खूप छान दिसतात आणि त्यांची जोडी खरंच खूप लव्हली आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्मृती-पलाश एकत्र येणार? लग्न मोडण्याच्या 4 महिन्यानंतर असं काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल