Raw Mango Drink : कडक उन्हात 'एक घोट करेल शरीर थंड, तुमचं पोट म्हणले थँक यू! असं बनवा कैरीचं पन्हं
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Raw Mango Drink Recipe : देशात हळूहळू तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांत तापमान 39 अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी स्थितीत कडक उन्हामुळं उष्माघातासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
1/9

उन्हाळ्यात अनेकजण शरीर थंड ठेवण्यासाठी लिंबू पाणी किंवा उसाचा रस अशा पारंपरिक पेयांचा आधार घेतात. असंच एक पारंपारिक पेय तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं. कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यात तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशन रोखण्यासाठी मदत करू शकते.
advertisement
2/9
कैरीचं पन्ह चविष्ट तर असतंच, शिवाय ते आरोग्यदायी देखील असतं. हे पन्ह कच्च्या आंब्यांपासून बनवलं जाणारं एक लोकप्रिय भारतीय पेय आहे. हे पन्हं शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतं आणि उष्माघात टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. कैरीचं पन्ह बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे.
advertisement
3/9
ते बनवण्यासाठी कच्चे आंबे गॅसवर त्यांची साल काळी पडेपर्यंत आणि आतील गर मऊ होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून आतील गर वेगळा करा. तयार झालेला कैऱ्यांचा गर पाणी, साखर किंवा गूळ, पुदिना, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि साधे मीठ घालून वाटून घ्या.
advertisement
4/9
हे तयार झालेलं घट्ट मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर एका ग्लासमध्ये बर्फ, 3 ते 4 चमचे पन्ह आणि थंड पाणी घ्या आणि तयार झालेलं हे पेय पुदिन्याच्या पानांसोबत सर्व्ह करा.
advertisement
5/9
आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. विपिन सिंग यांनी सांगितलं की, कैरीचं पन्ह उष्माघातापासून तर सुरक्षित ठेवतंच, शिवाय पचनसंस्था देखील मजबूत करतं. कच्च्या आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे अनेक हंगामी आणि संसर्गजन्य आजार शरीरापासून दूर राहतात.
advertisement
6/9
आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. विपिन सिंग यांनी सांगितलं की, कैरीचं पन्ह उष्माघातापासून तर सुरक्षित ठेवतंच, शिवाय पचनसंस्था देखील मजबूत करतं. कच्च्या आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे अनेक हंगामी आणि संसर्गजन्य आजार शरीरापासून दूर राहतात.
advertisement
7/9
याशिवाय कैरीचं पन्ह प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो. डॉ. सिंग यांनी सांगितले की, तुम्ही कैरीचं पन्हं बनवण्यासोबतच चटणी, मुरब्बा, लोणचं, पावडर आणि जॅम असे पदार्थ देखील बनवू शकता. परंतु जास्त प्रमाणात ते पिण टाळावं असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. अतिप्रमाण झाल्यास पोट फुगणे किंवा पोटात गोळा येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
8/9
घरी बनवलेलं कैरीचं पन्ह रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद बाटलीत ठेवल्यास सुमारे एका आठवड्यासाठी सुरक्षित राहतं. तुम्ही आठवडाभर पुरेल इतकं मिश्रण तयार करू ठेवू शकता. उन्हाळ्यात बाजारातील महागड्या पेयांपेक्षा तुम्ही हे नैसर्गिक पेय पिऊन शरीर निरोगी आणि थंड ठेवू शकता.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Raw Mango Drink : कडक उन्हात 'एक घोट करेल शरीर थंड, तुमचं पोट म्हणले थँक यू! असं बनवा कैरीचं पन्हं