TRENDING:

Mumbai Indians : फक्त 499 रूपयात बघा मुंबईची मॅच,कधी, कुठे आणि कसं मिळणार तिकीट?

Last Updated:

दरम्यान तुम्हाला माहिती आहे का मुंबईच्या या सामन्यांचे तिकीट तुम्हाला फक्त 499 रूपयात मिळणार आहे. हे तिकीट तुम्हाला कसं मिळवता येणार आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians Match Ticket Booking : येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता विरूद्ध खेळवला जाणार आहे.हा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यांची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.दरम्यान तुम्हाला माहिती आहे का मुंबईच्या या सामन्यांचे तिकीट तुम्हाला फक्त 499 रूपयात मिळणार आहे. हे तिकीट तुम्हाला कसं मिळवता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
mumbai indians 2026
mumbai indians 2026
advertisement

मुंबईचा कोलकत्ता विरूद्धचा पहिला सामना हा वानखेडेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे हा सामना वानखेडेच्या मैदानावर जाऊन पाहण्याची मजा वेगळी असणार आहे.प्रत्येकालाच वाटतं आपण सामना पाहिला गेलं पाहिजे,पण अव्वाच्या सव्वा तिकीट दरामुळे ते शक्य होत नाही.पण यंदा 499 रूपयात मुंबई इंडियन्सचा सामना पाहायची संधी मिळणार आहे.त्यामुळे चाहत्यांची उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे.आता हे तिकीट कधी आणि कुठे बुक करता येणार आहे? हे जाणूयात.

advertisement

वानखेडेवरील सामन्याचे तिकीट दर काय?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी पाण्यात मिळेल भरघोस उत्पादन, उन्हाळ्यात करा या पिकांची निवड, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
सर्व पहा

पहिल्यांदा आपण वानखेडेच्या मैदानावरील तिकीट दर जाणून घेऊयात.तर 499, 2800, 4500,5500,5900,6500,11500 असे या मुंबईच्या सामन्यांच्या तिकीटाचे दर आहेत. ही तिकीट चाहत्यांना फेज 2 मध्ये मार्च 21 ला दुपारी 3 वाजता आणि मार्च 22 ला देखील त्याच वेळेत बुक करता येणार आहे. तर फेज 3 मध्ये मार्च 22 ला संध्याकाळी 5 वाजता आणि मार्च 23 ला 5 वाजता सूरू होणार आहे.आता जर तुम्हाला मुंबईच्या या सामन्यांचे तिकीट बुक करायचे असतील तर बुकमायशो या साईटवर तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहेत.पण दिलेल्या वेळेत तुम्हाला ही तिकीट बुक करता येणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : फक्त 499 रूपयात बघा मुंबईची मॅच,कधी, कुठे आणि कसं मिळणार तिकीट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल