Coconut Water Effects : नारळपाणी कोणी पिऊ नये? उन्हाळ्यातलं हेल्दी ड्रिंक 'या' लोकांसाठी ठरू शकतं घातक!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Coconut water side effects : नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यात असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. परंतु काही वेळा हेच आरोग्यदायी पाणी घातक ठरू शकतं. चला पाहूया कसं.
advertisement
1/7

वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी प्यायल्यास शोषणावर परिणाम होऊ शकतो. कारण या वयात पचनक्रिया आणि इतर अवयव पूर्वीपेक्षा कमकुवत झालेले असतात. या वयात नारळाच्या पाणी प्यायल्यास शरीरात पोषक तत्वांचं असंतुलन होऊ शकतं.
advertisement
2/7
नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात असलेलं पोटॅशियम स्नायू आणि मज्जातंतूंसाठी गरजेचं असतं. परंतु वृद्ध व्यक्तींना नारळाच्या पाण्यामुळं हायपरकॅलेमिया होऊ शकतो. ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तातील पोटॅशियमची पातळी सामान्यपेक्षा जास्त वाढते. वृद्धांची चयापचय क्रिया मंद झाल्यामुळं शरीर अतिरिक्त पोटॅशियमवर लवकर प्रक्रिया करू शकत नाही. परिणामी हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि अचानक स्नायू कमकुवत होण्याची समस्याही उद्भवू शकते.
advertisement
3/7
वृद्धापकाळात किडनी कमी काम करते. यामुळे शरीर अतिरिक्त मिनरल्स आणि विषारी पदार्थ बाहेर टाकू शकत नाही. या वयात नारळाच्या पाण्याचा किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एखादी वृद्ध व्यक्ती किडनीच्या समस्यांनी त्रस्त असेल तर नारळाच्या पाणी प्यायल्याने तिच्या किडनीवर ताण येऊ शकतो. शरीरातील पोटॅशियम आणि सोडियमचं संतुलन बिघडू शकतं आणि ते जीवघेणमं देखील ठरू शकतं.
advertisement
4/7
रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये नारळाचं पाणी दुधारी तलवारीसारखं काम करतं. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ते उपयुक्त असलं तरी कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकतं. नारळाचे पाणी प्यायल्यानं रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. यामुळे चक्कर येणं, अशक्तपणा किंवा बेशुद्धी पडण्याच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
5/7
डॉ. सिराज सिद्दीकी यांनी सांगितलं की, मधुमेही लोकांनीही नारळ पाणी पिताना सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. कारण नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर आणि कार्बोहाड्रेट्स असतात. तुम्ही नारळ पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
advertisement
6/7
डॉ. सिराज सिद्दीकी यांनी सांगितलं की, अनेक वृद्ध लोकांनी नारळाचं पाणी प्यायल्यानंतर गॅस, पोटदुखी किंवा अतिसाराच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. नारळाच्या पाण्यातील नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स संवेदनशील पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा रात्री ते प्यायल्यास पचनाच्या समस्या वाढू शकतात.
advertisement
7/7
डॉ. सिद्दिकी यांनी सांगितले की, एखादी वृद्ध व्यक्ती कडक उन्हात फिरल्याने डिहायड्रेशन झाले असेल तर नारळ पाणी मर्यादित प्रमाणात पिणं योग्य ठरू शकतं. परंतु ते 'आरोग्यदायी पेय' आहे असे समजून नियमित पिणं वृद्ध लोकांसाठी हानिकारक ठरू शकतं. हृदय किंवा मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी ते अधिक धोकादायक ठरू शकतं. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coconut Water Effects : नारळपाणी कोणी पिऊ नये? उन्हाळ्यातलं हेल्दी ड्रिंक 'या' लोकांसाठी ठरू शकतं घातक!