TRENDING:

कधी आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, मराठी अभिनेत्यानं आज मुंबईत खरेदी केलं तिसरं घर

Last Updated:
कधी अभिनेत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. आज त्याच मराठी अभिनेत्यानं त्याचं तिसरं घर खरेदी केलं आहे.
advertisement
1/8
कधी आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, मराठी अभिनेत्यानं आज मुंबईत खरेदी केलं तिसरं घर
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि नव्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी चाहत्यांबरोबर आनंदाच्या बातम्या शेअर केल्यात.
advertisement
2/8
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नवीन घराचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली. त्यानंतर लगेचच आणखी एका मराठी अभिनेत्यानं आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही वर्षांआधी अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी करूनही घराचा ताबा मिळत नव्हता. अभिनेत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती पण आज त्याने त्याचं तिसरं घर खरेदी केलं आहे.
advertisement
3/8
अभिनेता अंशुमन विचारेनेही मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं आहे. अंशुमनची पत्नी पल्लवी विचारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि नव्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. याच दिवशी अंशुमन विचारेच्या आयुष्यात आणखी एक मोठी भर पडली आहे.
advertisement
4/8
पोस्टसोबत अंशुमनने नव्या घराची छोटीशी झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने हातात घराच्या किल्ल्या घेतलेला फोटो शेअर केलाय. तसच नव्या बिल्डिंगसमोर काढलेला फोटोही त्याने पोस्ट केला आहे.
advertisement
5/8
अंशुमनचं स्वत:चं हे तिसरं घर आहे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं तिसरं घर खरेदी करणं ही मोठी गोष्ट मानली जाते. अंशुमनच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
6/8
पल्लवीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आमच्या आयुष्यात आलेल हे तिसर घर आणि आभाळ भर झालेला आनंद तुम्हा सगळ्यान सोबत साजरा करण्यासाठी ही छोटीशी पोस्ट.'
advertisement
7/8
अंशुमन विचारेच्या यशामागे त्याच्या कुटुंबाची मोठी भूमिका आहे. त्याची पत्नी पल्लवी ही वकिल असून ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती युट्यूबवर व्हिडीओ बनवत असते आणि डेली व्लॉग्सद्वारे चाहत्यांशी संपर्कात राहते. कोविडच्या काळात अंशुमन आणि त्याची मुलगी अन्वीसोबतचे मजेशीर व्हिडीओ शेअर केले होते तेव्हापासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. 
advertisement
8/8
अंशुमन विचारेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सालबर्ली' या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय 'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे एकीकडे वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवत असताना दुसरीकडे करिअरमध्येही अंशुमन सक्रिय असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधी आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, मराठी अभिनेत्यानं आज मुंबईत खरेदी केलं तिसरं घर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल