Summer Best Drink : शहाळं की ताक, उन्हाळ्यात दोन्हींपैकी कोणतं प्यावं? कोणत्या ड्रिंकने मिळेल जास्त हायड्रेशन?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Coconut Water Vs Buttermilk : उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारचे कोल्ड ड्रिंक पितो. यामध्ये हेल्दी पर्यायांचा विचार केला तर शहाळं म्हणजेच नारळपाणी आणि ताक हे दोन्ही सगळ्यात आधी आपल्याला आठवतात. पण या दोन्हीपैकी आपल्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला पाहूया.
advertisement
1/7

नारळ पाण्याबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये फॅट्स कमी असतात आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. तसेच पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असत. यामुळं शरीरात द्रवांचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि डिहायड्रेशन होत नाही. नारळ पाणी रिकाम्याप[ओटी प्यायल्यास त्याचे जास्त फायदे होतात. कारण त्यामुळे शरीर व्यवस्थित सर्व पोषक तत्व शोषून घेते आणि इन्स्टंट हायड्रेशन मिळते.
advertisement
2/7
उन्हाळ्यात ताकदेखील शरीराला थंडठेवण्यासाठी चांगलं आहे. त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. ताकातील लॅक्टिक ॲसिड पचनास मदत करते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते. ताकामध्ये कॅलरीज कमी असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताक आपण विनसाखरेचे पिऊ शकतो. त्यामुळे इतर कोल्ड ड्रिंकपेक्षा ते नक्कीच फायदेशीर आहे.
advertisement
3/7
शहाळं आणि ताक ही दोन्ही पेयं शरीराला हायड्रेट करण्यासाठी बेस्ट आहेत. म्हणून ही दोन्ही पेयं तुम्ही दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी पिऊ शकता. या दोन्हीमध्ये अशी खास पोषक तत्वे असतात, जी शरीराला उत्तम प्रकारे कार्य करण्यास मदत करतात.
advertisement
4/7
दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे जास्त फायदेशीर असते. कारण ते पचनक्रियेस मदत करते. तर नारळपाणी व्यायामानंतर प्यावं. कारण ते इलेक्ट्रोलाइट्स वाढवण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करते. ही दोन्ही पेये नैसर्गिक आहेत आणि ती आपल्याला सहज उपलब्ध असतात. उन्हाळ्यात आपण ते आपल्या आहारात सहज सामील करू शकतो.
advertisement
5/7
ताकमध्ये तुम्ही जिरं आणि पुदिना टाकून ते आणखी फायदेशीर बनवू शकता. तसेच नारळ पाण्यात थोडा लिंबाचा रस घातल्याने त्यातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते आणि जास्त रिफ्रेशिंग बनते. याचा अर्थ ही दोन्ही पेय उन्हाळ्यात तुमच्यासाठी सारखेच फायदेशीर आहेत. हे तुमच्या शरीराचे पचन आणि हायड्रेशन दोन्ही चांगले ठेवतात.
advertisement
6/7
मात्र शहाळ्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यानं काही लोकांनी ते डॉक्टरांना विचारूनच प्यावे. ताक मधुमेहींसाठी फायदेशीर मानले जाते. कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी असते. ताकातील प्रोटीन पोट भरलेले ठेवतात, ज्यामुळे वारंवार अनहेल्दी खाणं टाळता येतं आणि वजन नियंत्रित राहातं.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Best Drink : शहाळं की ताक, उन्हाळ्यात दोन्हींपैकी कोणतं प्यावं? कोणत्या ड्रिंकने मिळेल जास्त हायड्रेशन?