TRENDING:

Women Safety : खरंच? एका क्लिकवर मिळणार न्याय; महिलांच्या तक्रारींसाठी विशेष पोर्टल, कशी करायची तक्रार?

Last Updated:
Thane News : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने दोन पोर्टल सुरु केले आहे. यामुळे महिलांना घरबसल्या ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार असून, सायबर गुन्ह्यांविरोधात तांत्रिक आणि कायदेशीर मदत मिळणार आहे.
advertisement
1/7
खरंच? एका क्लिकवर मिळणार न्याय; महिलांच्या तक्रारींसाठी विशेष पोर्टल, कशी करायची तक्रार?
राज्य सरकारने जागतिम महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांच्या सुरक्षेततेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरु केलेला आहे. नक्की हा उपक्रम काय आहे आणि कशा प्रकारे महिलांना याची मदत होईल,त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
advertisement
2/7
सध्या महिला सन्मान पोर्टल तसेच सायबर वेलनेस सेल यांची सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामुळे महिलांना आता तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज उरणार नाही. त्या घरबसल्या ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात.
advertisement
3/7
गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल माध्यमातून अनेक ब्लॅकमेलिंग आणि सायबर गुन्हे वाढत आहे. यामुळे सायबर वेलनेस सेल महिलांना तांत्रिक तसेत कायदेशीर मदत देणार आहे.
advertisement
4/7
जर कोणत्याही महिलेसोबत डिजिटल माध्यमातून कोणतेहा गुन्हा घडला असल्यास त्यांना राज्य सरकारच्या असलेल्या अधिकृत 'महिला सन्मान पोर्टल'या भेट द्यावी.
advertisement
5/7
ज्यात त्यांनी पहिल्यांदा तक्रार नोंदवा या पर्यायावार क्लिक करुन महत्त्वाच माहिती आणि घटनेचा तपशील भरावा.शेवटी तक्रार सबमिट केल्यानंतर एक युनिट आयडी दिला जाईल, ज्यावर तुम्हाला तक्रारीची स्थितीही तपासता येईल.
advertisement
6/7
राज्य सरकारचे हे पोर्टल राज्यातील सर्व पोलस ठाण्यांशी जोडले गेले असून तक्रार मिळताच ती संबंधित असलेल्या विभागाकडे पाठवली जाते. मग त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातात. विशेष म्हणजे महिलांना यावर काय कारवाई सुरु आहे त्याबाबतचीही माहिती ऑनलाईन मिळून शकते.
advertisement
7/7
आता महिलांनी त्यांच्या सोबत कोणत्याही प्रकाराचे झालेल्या गुन्हे लपवण्याची गरज नाही तर आता न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Women Safety : खरंच? एका क्लिकवर मिळणार न्याय; महिलांच्या तक्रारींसाठी विशेष पोर्टल, कशी करायची तक्रार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल