Frying Tips By Chef : भजी असो की कटलेट, अगदी परफेक्ट क्रिस्पी होतील! फॉलो करा शेफ संजीव कपूरच्या फ्राईंग टिप्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Prefect frying tips by chef sanjeev kapoor : घरी तळीव पदार्थ करताना काही वेळा ते बिघडतात. कधी पदार्थ तळल्यानंतर कुरकुरीत ना होता मऊ होतात, तर काही पदार्थ कमी जास्त तळले जातात. याचा समस्येवर सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी डीप फ्राइंगच्या काही बेस्ट टिप्स शेअर केल्या आहेत. या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या फ्राईड पदार्थांना उत्तम चव देण्यासाठी मदत करतील. चला पाहूया त्या टिप्स.
advertisement
1/7

योग्य तेल निवडा : जेव्हा डीप फ्राईंग करायचे असते तेव्हा योग्य तेल निवडल्याने खूप फरक पडतो. शेफ संजीव यांच्या मते, अन्न तळण्यासाठी सामान्य चव असलेले तेल निवडणे चांगले. तुम्ही काय तळत आहात यावरही ते अवलंबून असते. पश्चिम बंगालमध्ये मोहरीचे तेल पसंत करतात. कारण त्याचे आरोग्य फायदे आहेत आणि त्याचा स्मोकिंग पॉइंट देखील जास्त आहे. मात्र तुम्ही तुमच्या पदार्थण्यासार योग्य तेल निवडू शकता.
advertisement
2/7
तेलाचे तापमान : टाळण्यासाठी तेल खूप गरमही नसावे आणि खूप थंडही नसावे. जेव्हा डीप फ्राईंगचा विचार येतो तेव्हा तळण्यासाठी तेल योग्य तापमानावर गरम करा. ते नेहमीच अन्नाच्या प्रकारावर अवलंबून असते. खूप गरम तेलात अन्न तळल्यास बाहेरील कवच तळले जाते, पण आतील भाग कच्चा राहतो. म्हणून लक्ष ठेवा तेल खूप जास्त गरम करू नका. तसेच तेल पुरेसे गरम नसेल तर अन्न बरेच तेल शोषून घेते आणि जड बनते.
advertisement
3/7
एकावेळी जास्त प्रमाणात तळू नका : तळताना कधीही पॅनमध्ये पदार्थाची जास्त गर्दी करू नका. शेफ संजीव यांच्या मते, एकाच वेळी खूप तुकडे तळू नका. जर तुम्ही पॅनमध्ये जास्त गर्दी केली तर पॅनचे तापमान एकसारखे राहत नाही, ज्यामुळे पदार्थ अर्धवट शिजतात. बाजू उलटण्यासाठी पुरेशी जागा असावी जेणेकरून ते दोन्ही बाजूंनी समान तळले जातील.
advertisement
4/7
जास्तीचे ब्रेडक्रंब काढून टाका : तळलेले पदार्थ परिपूर्ण कुरकुरीत होण्यासाठी अनेकदा रवा किंवा ब्रेडक्रंबचा थर वापरतात. लोक अनेकदा ब्रेडक्रंब अन्नातून पडतात आणि तेलात बसतात अशी तक्रार करतात. शेफ संजी सुचवतात की तळण्यापूर्वी तुकडे व्यवस्थित कॉर्न स्टार्चमधे बुडवा आणि जास्तीचे ब्रेडक्रंब काढून टाका.
advertisement
5/7
घाई करू नका : तळणे ही संयमाची कृती आहे. कधीही घाई करू नका. जर तेल योग्य तापमानावर गरम केले असेल तर तुम्हाला ते जास्त उलटण्याची गरज नाही भासणार नाही. तुम्ही अन्नाला जास्त स्पर्श केला तर ते पॅनमध्येच फुटू शकते.
advertisement
6/7
आकार एकाच ठेवा : तळताना सर्व तुकडे एकाच आकाराचे आहेत की नाही हे पाहा. जेणेकरून ते सर्व एकाच वेळी तळतील. जर ते एकाच आकाराचे असतील तर ते तळण्यास समान वेळ लागेल आणि अशा प्रकारे तळणे सोपे आहे, असे शेफ संजीव कपूर यांनी सांगितले.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Frying Tips By Chef : भजी असो की कटलेट, अगदी परफेक्ट क्रिस्पी होतील! फॉलो करा शेफ संजीव कपूरच्या फ्राईंग टिप्स