TRENDING:

Success Story : आईचा पारंपरिक मसाले बनवण्याचा अनुभव, लेकाने घरातून उभारला ब्रँड, आता महिन्याला होतीये एवढी कमाई

Last Updated:
संतोष कानगुलकर यांनी शेफ मसाले व्यवसायाची सुरुवात घरातून केली. आईच्या पारंपरिक मसाल्यांच्या अनुभवातून या व्यवसायाला दिशा मिळाली.
advertisement
1/5
आईचा पारंपरिक मसाले बनवण्याचा अनुभव, लेकाने घरातून उभारला ब्रँड, आता महिन्याला होतीये एवढी कमाई
‎‎लॉकडाऊनच्या काळात नोकरीवर संकट आल्यानंतर ‎संतोष कानगुलकर यांनी शेफ मसाले व्यवसायाची सुरुवात घरातून केली. आईच्या पारंपरिक मसाल्यांच्या अनुभवातून या व्यवसायाला दिशा मिळाली.
advertisement
2/5
‎नांदेडहून संभाजीनगरात आलेल्या संतोष यांचा प्रवास संघर्षमय ठरला. ‎भांडे घासण्यापासून सुरुवात करत त्यांनी शेफपर्यंत मजल मारली. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ‎
advertisement
3/5
‎‎कोरोना लॉकडाऊनमुळे नोकरीवर अनिश्चितता निर्माण झाली. त्याच काळात त्यांनी स्वतःचा मसाला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कमी भांडवलात सुरू झालेला हा व्यवसाय आज स्थिर झाला आहे. ‎
advertisement
4/5
‎शेफ मसालेची खासियत म्हणजे पारंपरिक पद्धतीने तयार होणारे मसाले. गिरणी किंवा मशीनचा वापर न करता जात्यावर मसाले तयार केले जातात. प्रिझर्वेटिव्ह नसलेले शुद्ध मसाले ग्राहकांना आकर्षित करत आहेत. ‎
advertisement
5/5
आज त्यांच्या ब्रँडमध्ये 20 ते 25 प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. ‎रेडी-टू-कुक मसाल्यांमुळे ग्राहकांना सोयीस्कर पर्याय मिळतो. स्थानिक बाजारासह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही मोठी मागणी आहे. अडचणींवर मात करत त्यांनी व्यवसायात सातत्य ठेवले. ‎आज महिन्याला सुमारे 1 ते 1.25 लाखांचे उत्पन्न मिळते. लॉकडाऊनमधील संकटातून उभा राहिलेला हा प्रेरणादायी प्रवास आहे.‎
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : आईचा पारंपरिक मसाले बनवण्याचा अनुभव, लेकाने घरातून उभारला ब्रँड, आता महिन्याला होतीये एवढी कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल