द्राक्षं की मनुके? एकाच फळाचे दोन प्रकार, पण कोणामुळे मिळतात जास्त फायदे?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
द्राक्षे आणि मनुके हे दोन्हीही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तसेच ते दोन्हीही आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. अशातच हा प्रश्न पडतो की द्राक्षे आणि मनुके यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर पदार्थ कोणता?
advertisement
1/7

फळे आणि ड्रायफ्रुट्स खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. यामधील मिनरल्स आणि इतर पोषक घटक शरीराला आवश्यक असणारे पोषण पुरवतात. मनुकेही शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
advertisement
2/7
मनुक्यांचा आंबट-गोड स्वाद अनेकांना आवडतो. द्राक्षे सुकवून मनुके तयार केले जातात. बऱ्याच मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये यांचा आवर्जून वापर केला जातो. द्राक्ष्यांमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्के असते तर मनुक्यांमध्ये १५ टक्केच पाण्याचे प्रमाण असते.
advertisement
3/7
द्राक्षे आणि मनुके हे दोन्हीही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तसेच ते दोन्हीही आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. अशातच हा प्रश्न पडतो की द्राक्षे आणि मनुके यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर पदार्थ कोणता?
advertisement
4/7
द्राक्ष्यांमध्ये मनुक्यांच्या तुलनेत कमी कॅलरी आढळतात. द्राक्षे सुकवून मनुके तयार केले जातात. या प्रक्रियेत साखर आणि अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो. यामुळे मनुक्यांमधील कॅलरी वाढते. जर तुम्ही अर्धा कप द्राक्षं खाल्ली तर केवळ ३० कॅलरी मिळतील. याउलट जर तुम्ही तितक्याच मनुक्यांचे सेवन केल्यास २५० कॅलरी मिळतील.
advertisement
5/7
मनुक्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच यामध्ये लोह, पोटॅशिअम यांसारखे महत्त्वपूर्ण मिनरल्सही असतात. इतकंच नाही तर मनुक्यांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने आतड्यांना फायदा होतो.
advertisement
6/7
द्राक्ष्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे आपल्या त्वचेच्या पेशींसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर ते कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या अतिनील किरणांपासूनही आपली रक्षा करतात. द्राक्षांचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात.
advertisement
7/7
द्राक्षे आणि मनुके हे दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकते. मात्र या दोघांमध्ये द्राक्षांचे सेवन जास्त फायदेशीर आहे. कारण यात कमी कॅलरी असतात. ज्या पदार्थांमध्ये कमी कॅलरी असतात ते आरोग्यासाठी गुणकारी मानले गेले जाते. तसेच कोणतेही फळ त्याच्या मुळ स्वरूपातच खाणे चांगले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
द्राक्षं की मनुके? एकाच फळाचे दोन प्रकार, पण कोणामुळे मिळतात जास्त फायदे?