T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अडचणीत, एक जण आजारी, दोघांना डच्चू, प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार 3 बदल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. युएसएविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आजारी पडला आहे.
advertisement
1/5

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा सामना हा गुरूवारी नामिबियाविरुद्ध होणार आहे, पण या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
2/5
अभिषेक शर्मा हा आजारी असल्यामुळे सरावाला आला नसल्याचं टीम इंडियाचे कोच रेयान टेनडस्काटने सांगितलं आहे. अभिषेक शर्मा वेळेत फिट झाला नाही तर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.
advertisement
3/5
दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यामुळे तो टीममध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये सुंदरला संधी द्यायची असेल तर रिंकू सिंगला बाहेर बसावं लागू शकतं. युएसएविरुद्धच्या सामन्यात रिंकूला बॅटिंगमध्ये बराच संघर्ष करावा लागला होता. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही पर्याय देतो.
advertisement
4/5
युएसएविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह हा ताप आल्यामुळे खेळू शकला नव्हता. आता नामबियाविरुद्ध बुमराह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बुमराह टीममध्ये आला तर सिराजला बेंचवर बसावं लागेल.
advertisement
5/5
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : इशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अडचणीत, एक जण आजारी, दोघांना डच्चू, प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार 3 बदल!