T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला झटका, सगळ्यात मोठा मॅच विनर बाहेर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा सगळ्यात मोठा मॅच विनर असलेला खेळाडू वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
1/10

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा सगळ्यात मोठा मॅच विनर असलेला खेळाडू नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
2/10
गुरूवार 12 फेब्रुवारीला भारत आणि नामिबिया यांच्यात नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये मॅच होणार आहे, पण या सामन्यात ओपनर अभिषेक शर्माच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
3/10
टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेनडस्काटे याने अभिषेकच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. अभिषेक शर्मा हा आजारी आहे, मॅचआधी तो येईल अशी अपेक्षा आहे, असं रेयान टेनडस्काटे यांनी सांगितलं आहे.
advertisement
4/10
अभिषेक शर्माला पोटाचा त्रास होत आहे, त्यामुळे तो टीम इंडियाच्या सराव सत्रातही सहभागी झाला नाही. अभिषेक शर्मा गुरूवारची मॅच खेळला नाही, तर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
advertisement
5/10
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजपर्यंत संजू सॅमसन हा ओपनर म्हणून पहिली पसंत होता, पण लागोपाठ 5 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याच्याऐवजी इशान किशनला टीममध्ये स्थान मिळालं.
advertisement
6/10
अभिषेक शर्माच्या खेळण्याची शक्यता कमी असली तरी वॉशिंग्टन सुंदर टीममध्ये आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. सुंदरला टीममध्ये घेऊन स्पिन बॉलिंगचा आणखी एक पर्याय टीम इंडियासाठी उपलब्ध होईल.
advertisement
7/10
दरम्यान दुसऱ्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराहदेखील कमबॅक करेल, असं मानलं जात आहे. जसप्रीत बुमराह हा पूर्णपणे फिट असल्याचं टेनडस्काटेने सांगितलं आहे.
advertisement
8/10
युएसएविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बुमराह ताप आल्यामुळे खेळला नव्हता. मागचे 10 दिवस बुमराहने बॉलिंग केलेली नाही. तो आता बरा वाटत आहे, तसंच त्याच्या हालचालीही चांगल्या आहेत, असं टेनडस्काटे म्हणाला.
advertisement
9/10
बुमराह फिट असेल तर तो टीममध्ये येईल आणि मोहम्मद सिराजला वगळले जाईल, असं टेनडस्काटेने स्पष्ट केलं आहे.
advertisement
10/10
मोहम्मद सिराज हा भारताच्या वर्ल्ड कप टीमचा भाग नव्हता, पण हर्षित राणाला दुखापत झाल्यामुळे पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी सिराजची टीम इंडियात निवड झाली, यानंतर सिराज पहिला सामना खेळला आणि त्याने युएसए विरुद्ध 3 विकेटही घेतल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला झटका, सगळ्यात मोठा मॅच विनर बाहेर!