TRENDING:

Hair Care Tips : मुलींसाठी हेअर केअर सिक्रेट्स; फॉलो करा, केस होतील सिल्की-शाइनी-हेल्दी!

  • Published by:
Last Updated:
Special Tips To Maintain Long Hair : लांब केस सौंदर्य वाढवतात. पण त्यांची देखभाल करणे कधीकधी कठीण होऊ शकते, विशेषतः जेव्हा ते गुंतायला लागतात. योग्य काळजी घेतल्यास केस मजबूत आणि दाट बनतात, निरोगी आणि चमकदारदेखील होतात. तुम्हीही लांब केसांच्या समस्यांशी झुंझत असाल तर येथे काही सोप्या आणि प्रभावी टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही केसांची योग्य काळजी घेऊ शकाल.
advertisement
1/7
मुलींसाठी हेअर केअर सिक्रेट्स; फॉलो करा, केस होतील सिल्की-शाइनी-हेल्दी!
केस नियमितपणे धुवा : केस गुंतायला लागण्याचे एक मोठे कारण म्हणजे धूळ आणि अतिरिक्त तेल. म्हणूनच केसांना नियमितपणे धुणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते स्वच्छ आणि ताजे राहतील. जर तुमचे केस कोरडे असतील तर शॅम्पूनंतर नेहमी एक चांगला कंडिशनर लावा, ज्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहील.
advertisement
2/7
योग्य पद्धतीने केस विंचरा : ओले केस विंचरल्याने केस अधिक गुंतू शकतात आणि तुटू शकतात. म्हणूनच केस हलके ओले झाल्यावर किंवा सुकल्यानंतरच त्यांना विंचरा. रुंद दातांच्या कंगव्याचा वापर करा, जेणेकरून केस सहज सुटतील आणि तुटणार नाहीत.
advertisement
3/7
उष्णतेपासून बचाव करा : हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग आयर्नचा जास्त वापर केसांची गुणवत्ता खराब करू शकतो आणि त्यांना गुंतवू शकतो. जर स्टाइलिंग करणे आवश्यक असेल, तर हीट प्रोटेक्टंट स्प्रेचा वापर नक्की करा आणि हीटिंग टूल्सचा वापर मर्यादित करा.
advertisement
4/7
तेलाने मसाज करा : केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी नियमितपणे तेलाने मालिश करा. खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा आर्गन ऑईल केसांसाठी उत्कृष्ट आहेत. हे केसांना मऊ बनवतात आणि गुंतायला प्रतिबंध करतात.
advertisement
5/7
केस योग्य पद्धतीने बांधा : खूप जास्त घट्ट हेअरबँड किंवा रबर बँडमुळे केस तुटणे आणि गुंतागुंत वाढू शकते. म्हणूनच केसांना हलक्या आणि आरामदायक पद्धतीने बांधा, जेणेकरून ते सुरक्षित आणि मजबूत राहतील.
advertisement
6/7
स्कॅल्प मसाज करा : आठवड्यातून किमान दोनदा डोक्याची मसाज करा. यामुळे रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
advertisement
7/7
पोषक तत्वांनी युक्त आहार घ्या : केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहारही खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण पदार्थ समाविष्ट करा. जसे की हिरव्या भाज्या, फळे, अंडी, नट्स आणि मासे. यामुळे केसांची वाढ वेगवान होते आणि ते मजबूत राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Care Tips : मुलींसाठी हेअर केअर सिक्रेट्स; फॉलो करा, केस होतील सिल्की-शाइनी-हेल्दी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल