Marathwada Weather : मराठवाड्यात हवापालट, आज पुन्हा दुहेरी संकट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मराठवाड्यात गारठ्याचा अनुभव काही प्रमाणात कमी झालेला नाही. साधारणतः सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. आज 24 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यासह मराठवाड्यात सध्या तापमानात सतत बदल जाणवत आहेत. काही भागात तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे मराठवाड्यात गारठ्याचा अनुभव काही प्रमाणात कमी झालेला नाही. साधारणतः सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. आज 24 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी जाणवेल, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर किमान पारा 15 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार राहील. सकाळी दाट गारवा आणि रात्री बोचरा वारा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या सुमारास हवेत किंचित उबदारपणा वाढेल. बीडमध्ये आज कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर रात्रीचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव भागातही हवामान कोरडे असेल. दिवसभर आकाश स्वच्छ आणि वाऱ्यांचा जोर आधीच्या तुलनेने कमी राहणार आहे. लातूरमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असा पारा नोंदवला जाईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी केलेला नाही. कोकण भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार आलेले आहे त्याचा परिणाम मराठवाड्यावर देखील झाला. त्यामुळे येथे थंडी कमी झाली आहे. मात्र मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही, तरीही वाढत्या थंडीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाड्यात हवापालट, आज पुन्हा दुहेरी संकट, हवामान खात्याकडून अलर्ट