खर्च करू नका जास्त, घरातच लांबसडक केसांचं रहस्य, सगळे बघतील वळून वळून...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Hair Care Tips: लांबसडक, काळेभोर केस कोणाला नाही आवडत. परंतु सध्याच्या धावपळीत केसांची हवी तशी काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. परंतु जरा का होईना केसांसाठी वेळ काढायलाच हवा. (ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी / कोडरमा)
advertisement
1/7

केसगळती, केस झडणं या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. अनेकजणांचं तर विशीतच टक्कल पडायला लागतं. मग आपण विविध महागड्या क्रिम्स, तेल आणि शॅम्पू वापरतो. परंतु काही घरगुती उपायांनीही आपण आपले केस गळण्यापासून वाचवू शकतो. इतकंच नाही, तर केसांची वाढही सुरळीत होऊ शकते.
advertisement
2/7
मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए, ई आणि के प्रचंड असतं. ज्यामुळे केसांची मुळापासून लांबसडक वाढ होण्यास मदत मिळते. तसंच यातून आयर्न, मॅग्नेशियम आणि फॅटी ॲसिडही भरपूर प्रमाणात मिळतं.
advertisement
3/7
मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे मिसळून लावल्यास केसांची उत्तम वाढ होऊ शकते. यामुळे केसगळतीही कमी होते. सकाळी 1-2 चमचे उकळलेल्या तेलात मेथीचे दाणे वाटून मिसळावे. ही पेस्ट डोक्याला लावून 30-40 मिनिटं ठेवावी. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्यास केसांची व्यवस्थित वाढ होऊ शकते.
advertisement
4/7
आयुर्वेदात केसांसाठी कांद्याचा रसही अतिशय फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलंय. कांद्याच्या रसात असलेलं सल्फर कोलेजन वाढवतं. परिणामी केसांची वाढ जलद गतीनं होते. मोहरीच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्यास केस छान घनदाट आणि लांबसडक होऊ शकतात. केस धुवण्याच्या जवळपास 3 तास आधी किंवा रात्रभर हा उपाय करावा. मग शॅम्पूने केस धुवून घ्यावे. आठवड्यातून 2-3 वेळा या तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरेल.
advertisement
5/7
कोरफडाचा गर त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. 2-3 चमचे ताजा कोरफडाचा गर मिसळून मोहरीचं तेल हलकं तापवून घ्यावं. हे मिश्रण डोक्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरेल आणि केसांना मुळांपासून पोषण मिळेल. यामुळे केसांची वाढही उत्तम होऊ शकते.
advertisement
6/7
कढीपत्ते व्हिटॅमिन बी आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात. ही पानं घालून मोहरीचं तेल हलकं तापवून थंड करावं. या तेलानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. यामुळे केसगळती हळूहळू कमी होते. तसंच केसांची चांगली वाढ होते. कढीपत्त्यात असलेल्या बिटा-कॅरेटिनमुळे केस घनदाट होतात. तसंच ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे केसांमध्ये एक नैसर्गिक चमक येते. डॉ. प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
खर्च करू नका जास्त, घरातच लांबसडक केसांचं रहस्य, सगळे बघतील वळून वळून...