आल्याचा रस आरोग्यासाठी जबरदस्त! हृदयापासून पोटापर्यंत खूप फायदेशीर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आलं जवळपास प्रत्येक किचनमध्ये आढळतं. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आपण आल्याचा वापर करतो. परंतु जेवणातून चवीपुरतं पोटात जाणारं आलं आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. कारण त्यात औषधी गुणधर्म दडलेले असतात, असं तज्ज्ञ सांगतात. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5

डॉ. अंकुर जैन यांनी सांगितलं की, अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो. परंतु आल्याचा चहा पिण्यापेक्षा त्याचा रस प्यावा. त्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन, इत्यादी समस्या दूर होतात. तसंच डॉक्टरांनी आल्याच्या रसाचे इतरही काही फायदे सांगितले आहेत.
advertisement
2/5

आल्याचा रस प्यायल्यास इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढून रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. जर पोटासंबंधी काही व्याधी असतील किंवा तोंडात अल्सर झालं असेल तर आल्याचा रस पिणं हा रामबाण उपाय ठरू शकतो.
advertisement
3/5
आल्याचा रस प्यायल्यानं फंगल इन्फेक्शनही दूर होतं. जर शरिरात कुठे सूज असेल, अंगदुखी असेल तर आपण आल्याचा रस पिऊ शकता. महिलांना मासिकपाळीदरम्यान होणारा त्रासही यामुळे कमी होतो.
advertisement
4/5
आल्यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो आणि हृदय <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/panaceas-for-kidney-stones-are-in-your-kitchen-l18w-mhij-1218341.html">निरोगी राहण्यास मदत</a> मिळते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते. ज्यामुळे सर्दी, खोकला अशा साथीच्या आजारांपासून <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/bitter-melon-has-benefits-for-diabetes-and-liver-mhij-1217995.html">शरिराचं रक्षण</a> होतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/have-you-tried-ghee-in-coffee-doctor-tina-says-it-has-benefits-mhij-1218291.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
आल्याचा रस आरोग्यासाठी जबरदस्त! हृदयापासून पोटापर्यंत खूप फायदेशीर