TRENDING:

Actress Life: गटार शेजारच्या झोपडीत काढावी लागली रात्र, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ? नेमकं काय घडलं?

Last Updated:
Actress Life: मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकेसाठी अगदी काहीही करायला तयार असतात. भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि कनेक्टेड वाटण्यासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेत असतात.
advertisement
1/7
गटार शेजारच्या झोपडीत काढावी लागली रात्र, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ?
मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकेसाठी अगदी काहीही करायला तयार असतात. भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि कनेक्टेड वाटण्यासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेत असतात. अशीच एक अभिनेत्री जिला गटराच्या शेजारी झोपडीत राहावं लागलं होतं.
advertisement
2/7
गटार शेजारच्या झोपडीत काढावी लागली रात्र, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ?
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिव्या खोसला आहे. अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमासाठी चक्क गटारच्या शेजरी झोपडीत राहिली.
advertisement
3/7
अभिनेत्री दिव्या खोसला आणि अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच प्रेक्षकांसमोर एक वेगळा कॉमेडी-थ्रिलर घेऊन येत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ‘एक चतुर नार’. जो 12 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे नील नितीन मुकेश मोठ्या पडद्यावर परततोय.
advertisement
4/7
अलीकडेच अर्चना पूरण सिंग आणि तिचे पती परमीत सेठी त्यांच्या नव्या यूट्यूब शो 'डब्बे में क्या है?' मध्ये दिव्या आणि नीलला भेटले. या शोमध्ये गप्पा मारताना दिव्याने आपला अनुभव सांगितला.
advertisement
5/7
अभिनेत्री म्हणाली, “मला यूपी भाषा अजिबात येत नव्हती. पण मी ती घरी बसून शिकली. दररोज सराव केला. आमच्या दिग्दर्शकाने मला जवळपास एक महिना झोपडपट्टीत राहायला लावलं. माझी झोपडी नाल्याच्या काठावर होती. सुरुवातीला वास असह्य वाटायचा, पण नंतर मी त्याची सवय करून घेतली.”
advertisement
6/7
दिव्याने आणखी एक मजेशीर प्रसंग शेअर केला, "मी एका उघड्या गटाराजवळ उभी होते. मी त्यात पडणारच होते. मला खूप भीती वाटली. त्याचबरोबर मला झाडू-पोछा करायलाही लावला गेला. हे सर्व माझ्या भूमिकेसाठी होतं."
advertisement
7/7
दिव्या खोसला याआधी ‘सत्यमेव जयते 2’ आणि ‘यारियां 2’मध्ये दिसली होती. तर नील प्रेक्षकांच्या मनात ‘जॉनी गद्दार’ आणि ‘न्यूयॉर्क’सारख्या चित्रपटांमुळे लोकप्रिय आहे. आता दोघं मिळून कॉमेडी आणि थ्रिलचा तडका घेऊन परतत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: गटार शेजारच्या झोपडीत काढावी लागली रात्र, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ? नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल