TRENDING:

Budh Nakshtra: मंदीत संधी! 1 एप्रिलपर्यंत राहुच्या नक्षत्रात बुध; या 3 राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार

Last Updated:
Astrology: बुद्धी, तर्क, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह 1 एप्रिल 2026 पर्यंत शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाच्या नक्षत्रातील बदलाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण याचा थेट परिणाम व्यक्तीची निर्णयक्षमता आणि आर्थिक व्यवहारांवर होतो. बुध ग्रहाची ही चाल काही ठराविक राशींच्या लोकांसाठी भाग्योदयाची ठरणार असून त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या राजयोगासारखा भासणार आहे. या काळात आर्थिक चणचण दूर होऊन धनाच्या प्राप्तीचे नवीन मार्ग सापडतील.
advertisement
1/6
मंदीत संधी! 1 एप्रिलपर्यंत राहुच्या नक्षत्रात बुध; या 3 राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन वरदान ठरेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात मोठी प्रगती होईल आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी चालून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नतीचे (प्रमोशन) प्रबळ योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे समाजात तुमची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल.
advertisement
2/6
तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), संवाद किंवा मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या मेष राशीच्या लोकांना या काळात प्रचंड आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीसाठी देखील हा काळ अतिशय शुभ आहे.
advertisement
3/6
मिथुन - मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध ग्रह आहे, त्यामुळे शतभिषा नक्षत्रातील हा प्रवेश तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरणार आहे. करिअरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येतील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना मोठे यश मिळेल.
advertisement
4/6
मिथुन - नोकरीमध्ये बदली किंवा पगारवाढीचे शुभ संकेत मिळत आहेत. जर तुमचे परदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न असेल, तर 1 एप्रिलपूर्वी त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची संवादशैली प्रभावी ठरेल, ज्याचा फायदा तुम्हाला व्यावसायिक करारांमध्ये होईल.
advertisement
5/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. पैशांशी संबंधित असलेल्या सर्व समस्या हळूहळू दूर होतील. जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा तुम्ही कोणाला उधार दिले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
6/6
मकर - यापूर्वी शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक आता तुम्हाला मोठा नफा मिळवून देईल. जे लोक भागीदारीत (पार्टनरशिप) नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Budh Nakshtra: मंदीत संधी! 1 एप्रिलपर्यंत राहुच्या नक्षत्रात बुध; या 3 राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल