TRENDING:

Shani Asta 2026 : आजपासून शनि अस्त होणार! पुढील ४० दिवस ३ राशींना सर्वाधिक धोका, काय काळजी घ्यावी लागणार?

Last Updated:

Today Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना कर्मफळदाता आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनिचे विशेष महत्त्व आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना कर्मफळदाता आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनिचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शनीच्या स्थितीत होणारा कोणताही बदल अनेक राशींवर परिणाम करणारा ठरतो. ज्योतिषांच्या मते १३ मार्चपासून शनी मीन राशीत अस्त होणार आहेत. ही स्थिती सुमारे ३५ दिवस कायम राहणार असून १७ एप्रिल २०२६ पर्यंत शनी अस्त अवस्थेत राहतील.
Shani Asta 2026
Shani Asta 2026
advertisement

या काळात काही राशींसाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. आर्थिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता ज्योतिषांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या काळात संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

तूळ राशी

तूळ राशीत शनिला उच्च स्थान प्राप्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे या राशीवर शनिचा प्रभाव विशेष मानला जातो. मात्र शनी अस्त अवस्थेत असताना त्याचे काही नकारात्मक परिणामही दिसून येऊ शकतात.

advertisement

या काळात खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पाऊल टाकणे आवश्यक आहे.

मकर राशी

राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे शनिच्या अस्ताचा परिणाम या राशीच्या व्यक्तींवर अधिक जाणवू शकतो. या काळात आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटू शकते. तसेच प्रलंबित वाद किंवा कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे.

advertisement

आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणाकडून पैसे उधार घेणे किंवा देणे टाळावे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अधिक मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. या काळात मानसिक स्थैर्य राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी धार्मिक साधना करणे लाभदायक ठरू शकते.

कुंभ राशी

या राशीचाही स्वामी ग्रह शनी असल्यामुळे शनी अस्त असताना या राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव जाणवू शकतो. विशेषतः करिअर आणि व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना अधिक विचार करण्याची गरज आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. व्यवसायात काही अडचणी किंवा अनपेक्षित अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यातही मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) 

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shani Asta 2026 : आजपासून शनि अस्त होणार! पुढील ४० दिवस ३ राशींना सर्वाधिक धोका, काय काळजी घ्यावी लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल