TRENDING:

Sukanya Samriddhi Yojana: महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर मुलीच्या 21 व्या वर्षी किती मिळतील?

Last Updated:
सुकन्या समृद्धी योजना: महिन्याला १,००० रुपये बाजूला काढून १५ वर्षांत ५.५ लाख रुपये जमा होतील. ८.२% व्याजदर, करमुक्त रक्कम, उच्च शिक्षणासाठी ५०% रक्कम वापरता येते. खातं उघडणं सोपं.
advertisement
1/8
महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर मुलीच्या 21 व्या वर्षी किती मिळतील?
तुम्हाला वाटत असेल की लाखांचा निधी जमा करण्यासाठी हजारो रुपये वाचवावे लागतील, तर तसं अजिबात नाही. दिवसाला फक्त ३३ रुपये म्हणजे महिन्याला १,००० रुपये बाजूला काढले तरी तुमच्या लेकीसाठी डोंगरउभा राहू शकतो.
advertisement
2/8
१५ वर्ष तुम्ही हे पैसे भरायचे आणि तिचं २१ वं वर्ष उजाडेपर्यंत तुमच्या खात्यात ५,५४,२०६ रुपये जमा असतील! विचार करा, महिन्याला एका हॉटेलिंगच्या खर्चात लेकीचं भविष्य सुरक्षित होतंय.सुकन्या समृद्धी योजनेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याचा ८.२% व्याजदर.
advertisement
3/8
आज कोणत्याही बँकेत जा, एवढं व्याज तुम्हाला कशावरच मिळणार नाही. तुमची मुद्दल तर सुरक्षित आहेच, पण त्यावर मिळणारे ३.७४ लाख रुपये हे निव्वळ व्याजाचे आहेत. म्हणजे 'आमच्या लेकीचं सोनं झालं' असं म्हणण्याची वेळ ही योजना नक्कीच आणते.
advertisement
4/8
अनेकांना भीती वाटते की मॅच्युरिटीच्या वेळी सरकार टॅक्स कापून घेईल का? तर सुकन्या समृद्धीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 'EEE' कॅटेगरीत येते. म्हणजे तुम्ही भरलेले पैसे करमुक्त, त्यावर मिळणारं व्याज करमुक्त आणि शेवटी मिळणारी ५.५ लाखांची रक्कमही पूर्णपणे करमुक्त! एक रुपयाही सरकार कापणार नाही, सगळा पैसा तुमच्या लेकीचा!
advertisement
5/8
मुलगी १८ वर्षांची झाली की उच्च शिक्षणासाठी मोठ्या पैशांची गरज भासते. अशा वेळी ही योजना तुमच्या पाठीशी उभी राहते. खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम तुम्ही शिक्षणासाठी काढू शकता. म्हणजे तिच्या पदवी किंवा डॉक्टर-इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना पैशांची आडकाठी येणार नाही.
advertisement
6/8
हे खातं उघडणं चहा बनवण्याइतकं सोपं आहे. तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत जा. लेकीचा बर्थ सर्टिफिकेट, तुमचं आधार आणि पॅन कार्ड सोबतीला ठेवा. अवघ्या २५० रुपयांत तुम्ही हे खातं सुरू करू शकता. लक्षात ठेवा, मुलगी १० वर्षांची व्हायच्या आत हे पाऊल उचलणं गरजेचं आहे.
advertisement
7/8
आज तुम्ही वाचवलेला एक-एक रुपया तिच्या २१ व्या वर्षी तिला स्वावलंबी होईल. सुकन्या समृद्धी ही केवळ गुंतवणूक नाही, तर लेकीला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. या योजनेचा कालावधी आणखी 5 वर्ष वाढवता येतो.
advertisement
8/8
डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही योजनेची माहिती आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी सल्ला नाही. त्यामुळे पैसे गुंतवताना तुमच्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदारी घेत नाही अथवा खातरजमा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Sukanya Samriddhi Yojana: महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर मुलीच्या 21 व्या वर्षी किती मिळतील?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल