TRENDING:

क्रिकेटरसोबत अफेअर, 8 वर्ष ठेवलं लपवून; लग्नानंतर कुठे गायब झाली इमरान हाशमीची ही हिरोईन

Last Updated:
इमरान हाशमीची ही हिरोईन जी क्रिकेटरच्या प्रेमात पडली. त्यांचे अफेअर 8 वर्ष सीक्रेट ठेवलं. लग्न करून ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली.
advertisement
1/9
क्रिकेटरसोबत अफेअर, 8 वर्ष ठेवलं लपवून; लग्नानंतर कुठे गायब झाली इमरान हाशमीची ही हिरोईन
इमरान हाशमीही हिरोईन जिच्याबरोबर दिलेला किसिंग खूप चर्चेत आला होता. इमरानची हिरोईन जी नंतर प्रसिद्ध क्रिकेटरच्या प्रेमात पडली. तिच्या एका गाण्यानं क्रिकेटर तिच्या प्रेमात पडला. पुढे दोघांची सेटिंग लावण्यासाठी युवराज सिंगला पुढाकार घ्यावा लागला होता.
advertisement
2/9
भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. या यादीत हरभजन सिंगचाही समावेश आहे. हरभजन सिंगने 2015 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री गीता बसराशी लग्न केले.
advertisement
3/9
2007 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गीताने हरभजन सिंगला फोन करून त्याचं अभिनंदन केले. त्यानंतर हरभजन सिंगने गीताला आयपीएल पाहण्यासाठी फोर्स केला पण ती आली नाही. काही दिवसांनी त्यांच्या भेटी होऊ लागल्या आणि त्यांची जवळीक वाढली. हरभजनने गीताला प्रपोज केले तेव्हा गीता तयार नव्हती.
advertisement
4/9
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या प्रेमकथेची सुरुवात खूपच मनोरंजक आहे. हरभजनने एकदा गीताला त्याच्या एका गाण्यामध्ये पाहिले होते. ते गाणे होते "वो अजनबी." तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हरभजन लगेचच गीताच्या प्रेमात पडला.
advertisement
5/9
2007  मध्ये लंडनमध्ये एका मित्राच्या पार्टीत दोघे पहिल्यांदा भेटले होते, जेव्हा भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्याने संघातील सहकारी युवराज सिंगकडून गीताचा नंबर मिळवला. पण कथेत एक ट्विस्ट आला.
advertisement
6/9
गीता त्यावेळी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छित होती आणि तिला तिच्या आयुष्यात इतक्या सहजपणे कोणालाही येऊ द्यायचे नव्हते. यामुळे भज्जीला तिच्याशी बोलण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. गीता सतत हरभजनच्या फोन कॉल्सकडे दुर्लक्ष करत असे.
advertisement
7/9
हरभजनने तिला स्पष्टपणे सांगितले होते की, "मी फक्त तुझ्याशी लग्न करेन." हे ऐकून गीता आश्चर्यचकित झाली. गीताने हरभजनला हो म्हणण्यासाठी 10 महिने घेतले. तिने विनोदाने एक अट घातली की जर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 वीकेट पूर्ण केले तरच ती हो म्हणेल.
advertisement
8/9
काही दिवसांतच त्याने ही अट पूर्ण केली.  जवळजवळ आठ वर्षे दोघे रिलेशनमध्ये होते. गीता तिच्या कारकिर्दीत व्यस्त होती आणि हरभजन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर होता. दोघांची त्यांचं नातं सीक्रेट ठेवलं होतं.
advertisement
9/9
29 ऑक्टोबर 2015 रोजी दोघांनी लग्न केले. हरभजन आणि गीता दोन मुलं आहेत. गीताने आता अभिनयातून ब्रेक घेतला आहे आणि ती तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहे. तर हरभजनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि कॉमेन्ट्री, राजकारणात प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
क्रिकेटरसोबत अफेअर, 8 वर्ष ठेवलं लपवून; लग्नानंतर कुठे गायब झाली इमरान हाशमीची ही हिरोईन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल