Weather Alert : महाराष्ट्रावर दुहेरी संकट, उष्णतेच्या लाटेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना 13 मार्च रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना 13 मार्च रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट कायम असेल. 13 मार्च रोजी विभागानुसार हवामान कसं असेल पाहुयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम असेल. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश, किमान 18-21 अंश तापमान राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश आणि रात्री 19-22 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-39 अंशांपर्यंत तर किमान 20-23 अंश तापमान राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-40 अंश तर किमान 21-24 अंश तापमान राहील. यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
7/7
एकंदरीत, 13 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तीव्र चटका कायम राहील, पण पुढील काही दिवसांत काही भागांत पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर दुहेरी संकट, उष्णतेच्या लाटेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट