Kitchen Tips : माठातलं पाणी दिवसभर राहील गारेगार! 'या' 6 सोप्या पद्धतींनी वाढवा माठाची कुलिंग कपॅसिटी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to keep earthen pot water cold : आता ऊन चांगलंच तापतंय. थंड पाण्यासाठी आता फ्रिजमध्ये बॉटल्स ठेवल्या जात आहेत. काही लोकांना फ्रिजच्या थंड पाण्याशिवाय जमतच नाही. पण काही लोकांना मात्र फ्रिजचं पाणी जमत अशी लोकं माठ वापरतात. पण काहीवेळा हा माठ व्यवस्थित पाणी थंड करत नाही. यावरच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
advertisement
1/7

नवा माठ खरेदी केल्यानंतर लगेच त्यात पाणी भरू नका. सर्वात आधी माठ 6-8 तास पाण्यात भिजवा. यामुळे मातीतील भेगा भरल्या जातात आणि मठातून पाणी जास्त गळत नाही.
advertisement
2/7
माठातील धूळ आणि माती काढून टाकण्यासाठी तो व्यवस्थित स्वच्छ करा. यासाठी तांदूळ आणि थोडे पाणी भांड्यात घाला आणि 5 मिनिटे व्यवस्थित हलवून घ्या. यामुळे मातीचे सर्व कण निघतात. तुम्ही स्वच्छ कापडाने किंवा मऊ ब्रशनेदेखील स्वच्छ करू शकता.
advertisement
3/7
माठात पहिल्यांदा पाणी भरण्यापूर्वी त्यात थोडीशी हळद आणि पाणी टाका किंवा 1-2 चमचे मेथीचे दाणे आणि पाणी टाका. हे 3-4 तास तसेच राहू द्या. यामुळे मातीचा वास निघून जातो आणि पाण्याची चव सुधारते.
advertisement
4/7
माठ शक्य तितका बाहेरून ओला ठेवा. माठाची बाहेरची बाजू ओली असल्यावर पाणी थंड राहतं. कारण मातीच्या नैसर्गिक बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पाणी थंड होतं. म्हणून भांड्यावर हलके पाणी शिंपडा किंवा ओल्या कापडाने झाका.
advertisement
5/7
माठ पाण्याने भरण्यापूर्वी उकळलेले आणि थंड केलेले पाणी त्यात भरा. याने पहिल्या दिवशी माठ फ्रेश होतो. हे पाणी माठ स्वच्छ ठेवते आणि माठाचा आधीचा काही वाईट वास असेल तर तो निघून जाईल.
advertisement
6/7
माठ नेहमी उन्हापासून दूर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. यामुळे पाणी थंड राहातं. या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा माठ उन्हाळ्यासाठी एकदम रेडी करू शकता. तुमचा संपूर्ण उन्हाळा यामुळे सुसह्य होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : माठातलं पाणी दिवसभर राहील गारेगार! 'या' 6 सोप्या पद्धतींनी वाढवा माठाची कुलिंग कपॅसिटी