TRENDING:

वसईकरांच्या जीवाशी खेळ! चक्क माशांवर मारला झुरळ मारण्याचा 'लाल हिट' स्प्रे; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Last Updated:

व्हिडिओमध्ये संबंधित मच्छी विक्रेता आपल्या दुकानातील माशांवर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘लाल हिट’ स्प्रे मारताना स्पष्टपणे दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  वसई पूर्वेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झुरळं मारण्यासाठी वापरलं जाणारं ‘लाल हिट’ स्प्रे चक्क माशांवर मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

वसई पूर्वेतील नवजीवन परिसरातील एका मच्छी विक्रेत्याचा हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका जागरूक नागरिकाने हा व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित मच्छी विक्रेता आपल्या दुकानातील माशांवर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘लाल हिट’ स्प्रे मारताना स्पष्टपणे दिसत आहे.

advertisement

आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक

विशेष म्हणजे हा स्प्रे झुरळं आणि कीटक मारण्यासाठी वापरला जातो आणि तो अत्यंत विषारी मानला जातो.

अशा प्रकारे अन्नपदार्थांजवळ किंवा माशांवर हा स्प्रे वापरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

[video width="464" height="832" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-12-at-9.29.02-PM-2026-03-ceab9080f7c0e10035f2e0084e7fee1c.mp4"][/video]

नागरिकांमध्ये तीव्र संताप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित मच्छी विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माशांवर कीटकनाशक स्प्रे वापरण्याचा हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू आहे, आणि यामागे अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता प्रशासन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
वसईकरांच्या जीवाशी खेळ! चक्क माशांवर मारला झुरळ मारण्याचा 'लाल हिट' स्प्रे; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल