TRENDING:

बड्या सुपरस्टार्सना जमलं नाही, ते या 'म्हातारी'ने करून दाखवलं! 63 वर्षीय अभिनेत्रीचा बॉक्स ऑफिसवर दबदबा

Last Updated:
कोणताही बडा सुपरस्टार नसताना, केवळ एका ६३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या खांद्यावर या सिनेमाने जी गगनभरारी घेतली आहे, ती पाहून बड्या बड्या दिग्दर्शकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/7
बड्या सुपरस्टार्सना जमलं नाही, ते या 'म्हातारी'ने करून दाखवलं! 63 वर्षीय अभिनेत्रीचा बॉक्स ऑफिसवर दबदबा
सिनेमा चालण्यासाठी मोठा हिरो, ५०० कोटींचं बजेट आणि परदेशातील लोकेशन्स लागतात, हा समज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका छोट्या सिनेमाने पार धुळीस मिळवला आहे.
advertisement
2/7
सध्या सोशल मीडियापासून ते बॉक्स ऑफिसपर्यंत एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे 'थाई किझावी'. कोणताही बडा सुपरस्टार नसताना, केवळ एका ६३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या खांद्यावर या सिनेमाने जी गगनभरारी घेतली आहे, ती पाहून बड्या बड्या दिग्दर्शकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
3/7
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी या वयातही सिद्ध करून दाखवलंय की, कंटेंट राजा असेल तर प्रेक्षक थिएटर्सकडे धावत येतातच. शिवकुमार मुरुगेसन दिग्दर्शित हा 'कॉमेडी ड्रामा' चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला.
advertisement
4/7
सुरुवातीला कोणालाही वाटलं नव्हतं की हा सिनेमा इतकी मोठी मजल मारेल. पण माऊथ पब्लिसिटी आणि जबरदस्त विनोदी कथानकामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावली आहे.
advertisement
5/7
'थाई किझावी'चं एकूण बजेट अवघं ९ कोटी रुपये होतं. पण याच छोट्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या १० दिवसांतच जगभरात ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. म्हणजेच आपल्या बजेटच्या ५ पट अधिक कमाई या सिनेमाने केली आहे.
advertisement
6/7
'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात ५४ कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यापैकी भारतातून ३८ कोटी रुपये आले आहेत. पहिल्या दिवशी २.६५ कोटींची संथ सुरुवात करणाऱ्या या सिनेमाने वीकेंडला जो वेग पकडला, तो अद्याप थांबलेला नाही.
advertisement
7/7
केवळ कमाईच नाही, तर प्रेक्षकांच्या पसंतीच्या बाबतीतही हा सिनेमा अव्वल ठरला आहे. IMDb सारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे. एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबातील आजी आणि तिची मजेशीर धावपळ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट आहे, जी प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला आपलीशी वाटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बड्या सुपरस्टार्सना जमलं नाही, ते या 'म्हातारी'ने करून दाखवलं! 63 वर्षीय अभिनेत्रीचा बॉक्स ऑफिसवर दबदबा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल