TRENDING:

RTO APK File डाऊनलोड केली, पोलिसाच्या खात्यातून खटाखट खटाखट...निवृत्त अधिकाऱ्याला कसा गंडा घातला?

Last Updated:

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला RTO APK File डाऊनलोड करण्याचा मैसेज आला होता. हा मेसेज पोलिसांच्या ग्रुपवर आल्याने अधिकाऱ्यांनी तो डाऊनलोड केली आणि त्यांना मोठा फटका बसला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Crime News : संकेत वरत, प्रतिनिधी, मुंबई : ऑनलाईन फसवणूकीच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.ज्यामध्ये सर्वसामान्य नागरीकांची ऑनलाईन माध्यमातून मोठी फसवणूक झाली आहे. पण या घटनेत आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला शिकार सायबर चोरट्यांनी केली आहे.त्याचं झालं असं की पीडित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला RTO APK File डाऊनलोड करण्याचा मैसेज आला होता. हा मेसेज पोलिसांच्या ग्रुपवर आल्याने अधिकाऱ्यांनी तो डाऊनलोड केली आणि त्यांना मोठा फटका बसला होता.या प्रकरणी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
mumbai news
mumbai news
advertisement

मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या वेळी फसवणुकीचा बळी ठरले आहेत ते स्वतः एक निवृत्त पोलीस अधिकारी. पोलिसांच्या ग्रुपवर आलेल्या एका संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 18 हजार रुपये काढून घेण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

तक्रारदार गनमे हे महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 31 जुलै 2025 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअॅपवर RTO APK File

नावाची फाईल आली. हा मेसेज पोलिसांमधीलच एका वाहतूक विभागातील पोलीस हवालदाराच्या क्रमांकावरून आल्यामुळे गनमे यांना तो अधिकृत माहितीचा मेसेज असावा असे वाटले.

advertisement

नेमकं याच विश्वासाचा फायदा सायबर भामट्यांनी घेतला. काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती असावी या समजुतीने गनमे यांनी ती APK फाईल डाउनलोड केली. लिंक उघडताच पुढील पेजवर काही वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जात होते. त्यावेळी काहीतरी संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.संशय आल्याने त्यांनी लगेच संबंधित पोलीस हवालदाराला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्या हवालदाराने स्वतःचा व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याचे सांगत गनमे यांना सतर्क केले.

advertisement

...तोपर्यंत उशीर झाला होता

सुमारे दोन तासांनी, सकाळी 10.23 वाजण्याच्या सुमारास गनमे यांना त्यांच्या HDFC बँकेकडून मेसेज आला. त्या मेसेजनुसार त्यांच्या बँक खात्यातून 18 हजार रुपये डेबिट झाले होते. हा मेसेज पाहताच आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.यानंतर त्यांनी तात्काळ सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व्हॉट्सअॅप हॅक करून लिंक पाठवणाऱ्या सायबर भामट्यांचा शोध सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या घटनेमुळे पोलिसांनाही सायबर गुन्हेगारांनी कसे टार्गेट केले जाऊ शकते याचे आणखी एक उदाहरण समोर आले असून, कोणतीही संशयास्पद लिंक किंवा APK फाईल डाउनलोड करताना नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
RTO APK File डाऊनलोड केली, पोलिसाच्या खात्यातून खटाखट खटाखट...निवृत्त अधिकाऱ्याला कसा गंडा घातला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल