TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट, सूर्य आग ओकणार, अवकाळी झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं असून आता उष्णतेच्या लाटेसोबतच अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/8
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट, सूर्य आग ओकणार, अवकाळी झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट
Weather Alert: कुठं उष्णतेची लाट, तर कुठं अवकाळी अलर्ट, महाराष्ट्रातवर पुन्हा संकट
advertisement
2/8
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट निर्माण झाली होती. आता राज्यावर दुहेरी संकट घोंघावत आहे. 13 मार्च 2026 रोजी राज्यात सामान्यपणे हवामान उष्ण आणि करडे राहील. कोकणासह विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट असतानाच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
3/8
कोकण किनाऱ्यावर पुन्हा उष्णतेच्या लाटेचं संकट आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या उत्तर कोकणातील जिल्ह्यांना 48 तासांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात कमाल तापमान 36-39 अंश तर किमान 23-27 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
advertisement
4/8
मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत आज कोरडे हवामान असेल. परंतु, 24 तासांत मोठे उलटफेर होणार असून वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 35-38 अंश आणि किमान 18-23 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/8
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा पारा चाळीशी पार गेला आहे. आज कमाल तापमान 38-40 अंशांपर्यंत नोंदवलं जाईल. उष्णतेच्या लाटेचा इशारा नसला तरी नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. आज पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
6/8
.मराठाड्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत उष्ण आणि कोरडे हवामान राहील. परंतु, 24 तासानंतर हवामानात मोठे बदल जाणवतील. वादळी वाऱ्यांसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/8
विदर्भावर हवामानाचं दुहेरी संकट घोंघावत आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात आहे. अशातच आता अचानक हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेसोबतच अवकाळी अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट असून शनिवारपासून संपूर्ण विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे.
advertisement
8/8
दरम्यान, राज्यातील हवामानात मोठे बदल जाणत आहेत. काही भागात उष्णतेची लाट कायम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळी संकटाची शक्यता आहे. आज तापमान सरासरीपेक्षा 3-6 अंश सेल्सिअसने जास्त राहील. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दुपारी घराबाहेर जाणे टाळा आणि भरपूर पाणी प्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट, सूर्य आग ओकणार, अवकाळी झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल