TRENDING:

Pune News: पुण्यात खळबळ! एक तरुणी अन् दोन तरुण, शेवट भयंकर! रस्त्यातच बॅटनं ठेचून विशालला संपवलं

Last Updated:

आदित्य उमाप हा विशालच्या नात्यातील एका मुलीला वारंवार त्रास देत होता. विशालने आदित्यला समजावण्याचा प्रयत्न केला आणि "मुलीला त्रास देऊ नकोस," असे ठणकावून सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातून हत्येच्या बऱ्याच धक्कादायक घटना समोर आली आहेत. आता पुन्हा पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या धायरी भागात एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नात्यातील मुलीला होणारा त्रास थांबवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या घटनेमुळे धायरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाची रस्त्यातच हत्या (प्रतिकात्मक फोटो)
तरुणाची रस्त्यातच हत्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल हा व्यवसायाने टेलर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आदित्य उमाप हा विशालच्या नात्यातील एका मुलीला वारंवार त्रास देत होता. विशालने आदित्यला समजावण्याचा प्रयत्न केला आणि "मुलीला त्रास देऊ नकोस," असे ठणकावून सांगितले. मात्र, याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून आदित्यने विशालचा काटा काढण्याचे ठरवले.

advertisement

लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला

११ मार्चच्या रात्री विशाल धायरीतील डीएसके रस्त्यावरून जात असताना, दळवीवाडी फाट्याजवळील एका गोठ्यासमोर आदित्यने त्याला गाठले. आदित्यने आपल्याजवळील लाकडी बॅटने विशालच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी आदित्य उमाप फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करत आहेत. मात्र, क्षुल्लक कारणामुळे झालेल्या या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात खळबळ! एक तरुणी अन् दोन तरुण, शेवट भयंकर! रस्त्यातच बॅटनं ठेचून विशालला संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल