एका चुकीने होईल मोठी फसवणूक! पेट्रोल-डिझेल भरताना या 5 गोष्टींवर द्या लक्ष
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान पेट्रोल पंपावर लहान-लहान ट्रिक्सद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही कशी केली जाते आणि यापासून कसा बचाव करावा याविषयी टिप्स जाणून घेऊया.
advertisement
1/8

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होतेय. महागाईच्या या काळात एकदा टँक फूल करणेही सर्वसामान्यांच्या बजेटवर ओझं बनत आहे. पेट्रोलच्या किंमती 90 ते 105 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80 ते 95 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशावेळी तुम्ही फ्यूल भरता तेव्हा एक-एक रुपया महत्त्वाचा असतो. मात्र पेट्रोल पंपावर कर्मचारी लहान-लहान ट्रिक्स वापरुन ग्राहकांना फसवत असतात.
advertisement
2/8
कधी-कधी मीटर आधीपासून चालूच राहतो. तर कधी कमी इंधन दिलं जातं. कधी क्वालिटीमध्येही भेसळ असते. यामुळे फक्त तुमचा पैसा वाया जात नाही तर गाडीच्या परफॉर्मेंसवरही परिणाम होतो. वाढत्या किंमतींदरम्यान अतिरिक्त नुकसान सहन केले जाऊ शकत नाही. यामुळे इंधन भरताना पूर्णपणे सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्ही या 5 सोप्या पण गरजेच्या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर पेट्रोल पंपवर होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो. चला या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत यावर एक नजर टाकूया...
advertisement
3/8
झिरो चेक करा : पेट्रोल पंपावर फसवणुकीपासून बचाव करण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वपूर्ण पद्धत ही मीटरचा झिरो चेक करणे आहे. इंधन भरण्यापूर्वी नेहमी डिस्पेंसर मीटर 0.00 वर सेट असावा. अनेकदा कर्मचारी जाणिवपूर्वक मीटर रीसेट करत नाही आणि पूर्वीच्या ग्राहकाच्या उर्वरित रीडिंगनेच नवीन ट्रांझेक्शन सुरू करतात. यामुळे तुम्ही पैसे पूर्ण देत असला तरीही इंधन कमी मिळते. गाडीमधून उतरुन स्वतः मीटर पाहा आणि कर्मचाऱ्यांना रीसेट करण्यास सांगा. मीटर पहिल्यापासूनच चालू असेल तर लगेच त्याच्या निदर्शनास आणून द्या.
advertisement
4/8
ऑड अमाउंट निवडा : दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ऑड अमाउंटमध्यू इंधन भरणे. नेहमी 100, 200 किंवा 500 सारख्या राउंड फिगर ऐवजी 101, 203 किंवा 507 रुपयांसारक्या विषम अमाउंट सांगा. राउंड नंबरमध्ये कर्मचारी सहज शॉर्ट फ्यूलिंग करु शकतात. कारण कट-ऑफ सोपे असते. विषम अमाउंटमध्ये मीटरवर नजर ठेवणे सोपे होते. फसवणूक पकडणे कठीण राहत नाही. ही लहानशी सवय तुमचे पैसे वाचवू शकते.
advertisement
5/8
पूर्ण प्रोसेसवर नजर ठेवा : तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गाडीवरुन उतरुन प्रक्रियेवर नीट लक्ष द्या. कार किंवा बाइकवर बसून राहण्याची चूक करु नका. बाहेर निघा, पंपाजवळ उभे राहून मीटर आणि नोजल दोन्हीवर नजर ठेवा. अेकदा कर्मचारी तुम्हाला बोलण्यात गुंतवूण ठेवतात आणि लक्ष विचलित करतात. या दरम्यान ते मीटर फास्ट चालवतात किंवा हँडल दाबून एयर लॉक क्रिएट करतात. तुम्ही त्यांच्याजवळ उभे राहिलात तर ते असं करण्याची हिंमत करणार नाहीत.
advertisement
6/8
सील चेक करा : चौथी आवश्यक गोष्ट म्हणजे, नोजल आणि पंपचे सील तपासा. नोजल स्वच्छ असेल आणि त्यावर सरकारी कॅलिब्रेशन सील लावलेले आहे की नाही हे पाहा. सील निघालेली किंवा नोजल घाण असेल तर भेसळीचा धोका वाढतो. काही पंप परकेरोसिन मिक्स करतात. तुम्हाला संशय असेल तर दुसऱ्या पंपावर जा. नेहमी अधिकृत आणि मोठा ब्रांडचा पंप निवडा. ट्रान्सपरेन्सी जास्त राहते.
advertisement
7/8
पावती अवश्य घ्या : पाचवी आणि अंतिम गोष्ट म्हणजे, पावती अवश्य घ्या. तसंच ती पावती तपासून घ्या. फ्यूल भरल्यानंतर प्रिंटेड बिल मागा. त्यामध्ये पेट्रोलची मात्रा, अमाउंट, डेंसिटी आणि ट्रांझेक्शन डिटेल्स चेक करा. काही गडबड वाटली तर लगेच तक्रार करता. ऑइल कंपनीच्या टोल-फ्री नंबर किंवा कंज्यूमर हेल्पलाइन 1915 वर कॉल करा. पावती ठेवल्याने पुरावा मिळतो आणि दोषी पंपावर कारवाई होऊ शकते.
advertisement
8/8
या 5 गोष्टींची सवय करुन घेतली तर पेट्रोल-डिजेलच्या वाढत्या किंमतींचं ओझं कमी होईल. सतर्क राहिल्याने तुमची मोठी बचत होऊ शकते. पुढच्या वेळी इंधन भरायला गेल्यावर या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. तुमचं वाहनही चांगलं राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
एका चुकीने होईल मोठी फसवणूक! पेट्रोल-डिझेल भरताना या 5 गोष्टींवर द्या लक्ष