Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत हवापालट, उष्णतेची लाट नव्हे, आता अस्मानी संकट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील काही भागात 13-14 मार्चपासून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याचा जोर वाढला असून, बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान आहे. तर किनारी भागात उष्ण आणि दमट स्थिती कायम आहे, तर काही भागांत उष्णतेची लाट आहे. पुढील 2 दिवसांत पावसाची शक्यता कमी आहे, पण 13-14 मार्चपासून मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 12 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. आज कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. 12 मार्चला हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. उष्णतेच्या लाटेची स्थिती काही ठिकाणी कायम राहू शकते.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज मुख्यत: उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमानाचा पारा 33 ते 38 अंशांपर्यंत जाईल. आज पावसाची शक्यता नसली तरी 13-14 मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या पवसाचा अंदाज आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट असल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांत पारा चाळीशीच्या घरात गेला होता. आज कमाल तापमान 36-39 अंशांच्या दरम्यान राहील. हवामान कोरडे राहील. 12 मार्चला पावसाची शक्यता नसली तरी 13-14 मार्चला मात्र विजांसह हलका पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. विशेषतः अकोला, अमरावती भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 36-40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. नागपुरात देखील पारा चढलेलाच आहे. आज हवामान कोरडे आणि उष्ण असले तरी 24 तासांत हवापालट होणार आहे. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह मध्यम पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत कोरडे आणि उष्ण हवामान आहे. कमाल तापमान 35-39 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तर किमान 18-22 अंश राहील. आज पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात 12 मार्चला बहुतांश ठिकाणी उन्हाळी आणि कोरडे हवामान राहील. उकाडा आणि उष्णता जाणवेल, विशेषतः दुपारी ऊनाची तीव्रता जास्त असेल. किनारी भागात दमटपणा जास्त असेल. या काळात पाणी भरपूर प्या, थेट सूर्यप्रकाश टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत हवापालट, उष्णतेची लाट नव्हे, आता अस्मानी संकट