TRENDING:

Pune Crime: पुण्यात तरुणीनं आयुष्य संपवलं; 3 रूममेट्सनी पायलसोबत असं काय केलं? शेवटच्या नोटमध्ये धक्कादायक खुलासा

Last Updated:

पायल पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती आणि विठ्ठलनगरमधील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये तीन तरुणींसोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात एक हादरवणारी घटना घडली. यात एका १९ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रूमपार्टनर्सकडून होणारा मानसिक त्रास आणि बदनामीच्या भीतीपोटी या तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघा तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात तरुणीनं गळफास घेत आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात तरुणीनं गळफास घेत आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

पायल किशोर राजगुरू (वय १९, मूळ रा. मुळशी) असे मृत तरुणीचे नाव आहे. पायल पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती आणि विठ्ठलनगरमधील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये तीन तरुणींसोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत राहणाऱ्या रूमपार्टनर्सच्या नावांचा उल्लेख करत मानसिक छळाचा आरोप केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

पायलच्या रूममध्ये राहणाऱ्या सबुरी काळे, शिवानी आजबले आणि दीपाली यांच्या कपाटातून पैसे, पर्स आणि मोबाईल चोरीला गेले होते. हा मोबाईल पायलनेच घेतल्याचा आरोप करत या तरुणींनी तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणाची माहिती सर्वांना देऊन तिची बदनामी करण्याची धमकी तरुणी तिला देत होत्या. याच दहशतीपोटी पायलने आपले आयुष्य संपवले. पायलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही तरुणींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यात तरुणीनं आयुष्य संपवलं; 3 रूममेट्सनी पायलसोबत असं काय केलं? शेवटच्या नोटमध्ये धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल