TRENDING:

Health Tips: पावसाळ्यात ताक प्यावं की नाही? जर प्यायलं तर काय होईल?

Last Updated:
नेहमीच्या आहारात ताक हे उपयुक्त मानले जाते. पण पावसाळ्यात ताक पिणे शरीरासाठी योग्य आहे जाणून घ्या.
advertisement
1/7
पावसाळ्यात ताक प्यावं की नाही? जर प्यायलं तर काय होईल?
पावसाळा सुरु झाला की सर्दी, खोकला, पचनाच्या तक्रारी, त्वचाविकार यांसारख्या समस्या डोके वर काढतात. या काळात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
advertisement
2/7
नेहमीच्या आहारात ताक हे उपयुक्त मानले जाते, पण अनेकांना असा प्रश्न सतावतो की पावसाळ्यात ताक पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? याबद्दलचं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक असल्याने त्यात लॅक्टोबॅसिलस सारखे चांगले जंतू असतात. हे पचनतंत्र सुधारतात आणि बद्धकोष्ठता, अपचनासारख्या तक्रारी दूर करतात.
advertisement
4/7
दमट हवामानात शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. ताक हे शरीरात योग्य प्रमाणात द्रव टिकवून ठेवण्यास मदत करते. ताक हे थंड प्रभाव देणारे असल्यामुळे ते शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते, जी पावसाळ्यात चटकन वाढू शकते. ताकातील बॅक्टेरिया आणि अन्नघटक हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.
advertisement
5/7
दमट हवामानात ताक लवकर आंबट होते आणि अशा स्थितीत ते पिऊन पोट बिघडण्याचा धोका असतो. ताक थंड प्रवृत्तीचं असल्यामुळे आधीपासूनच सर्दी-खोकल्याची तक्रार असल्यास ते टाळावं.
advertisement
6/7
रात्रीच्या वेळी ताक पिणे थंडी वाढवू शकते, त्यामुळे सकाळ किंवा दुपारीच त्याचे सेवन उत्तम. पावसाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, पण योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास.
advertisement
7/7
विशेषतः जर तुम्हाला पचनाची तक्रार नसेल, सर्दी-खोकला नसेल तर तुम्ही नक्कीच ताकाचा आहारात समावेश करू शकता, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पावसाळ्यात ताक प्यावं की नाही? जर प्यायलं तर काय होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल