ओलं खोबरं खाल्ल्याने शुगर वाढते का? मधुमेही रुग्णांच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जेव्हा घरात कोणाला मधुमेह (Diabetes) होतो, तेव्हा खाण्यापिण्यावर अनेक बंधनं येतात. अशा वेळी 'ओलं खोबरं खावं की नको?' हा प्रश्न अनेकांना सतावतो.
advertisement
1/9

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ती देवाला वाहिलेली नारळाची वाटी असो, दक्षिण भारतीय चविष्ट चटणी असो किंवा पुरणपोळीसोबतची कटाची आमटी... नारळाशिवाय जेवणाला पूर्णत्व येत नाही. केवळ चवीसाठीच नाही, तर शुभ कार्याची सुरुवात देखील आपण नारळ वाढवूनच करतो. काही जणांना जेवताना ओलं खोबरं कच्चं खायलाही खूप आवडतं.
advertisement
2/9
पण, जेव्हा घरात कोणाला मधुमेह (Diabetes) होतो, तेव्हा खाण्यापिण्यावर अनेक बंधनं येतात. अशा वेळी 'ओलं खोबरं खावं की नको?' हा प्रश्न अनेकांना सतावतो. नारळात नैसर्गिक गोडवा असल्याने तो रक्तातील साखर वाढवेल का, अशी भीती अनेकांना वाटते. पण खरंच मधुमेही रुग्णांनी नारळापासून लांब राहावं का? याचे उत्तर तज्ज्ञांनी अतिशय सकारात्मक दिले आहे.
advertisement
3/9
काय सांगतात तज्ज्ञ?अनेकदा असा समज असतो की मधुमेहींनी नारळ खाऊ नये. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेही व्यक्ती मर्यादित प्रमाणात कच्चं ओलं खोबरं नक्कीच खाऊ शकतात. उलट, नारळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्यामुळे ते साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत करते.
advertisement
4/9
नारळ खाण्याचे मधुमेहींना होणारे फायदे:1. साखरेवर नियंत्रण (Sugar Spikes): नारळामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे फायबर पचनक्रिया संथ करते, ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी एकाएकी वाढत नाही. ज्यांना रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
5/9
2. झटपट ऊर्जा: नारळामध्ये मध्यम-साखळी फॅट्स (Medium-chain fats) असतात. हे फॅट्स शरीरात चरबी म्हणून साचण्याऐवजी लगेच ऊर्जेत रूपांतरित होतात. त्यामुळे अशक्तपणा जाणवणाऱ्या मधुमेहींसाठी हे ऊर्जावर्धक ठरते.3. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त: नारळातील तंतुमय पदार्थ (Fibre) पोट जास्त काळ भरलेले ठेवतात. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अवेळी स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते. टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते, त्यात नारळ मदत करतो.
advertisement
6/9
दिवसाला किती खोबरं खावं?कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. नारळामध्ये कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. त्यामुळे अतिसेवनाने वजन वाढू शकते किंवा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, मधुमेही रुग्ण दिवसाला साधारण 30 ते 40 ग्रॅम (सुमारे 2-3 मोठे चमचे) ओलं खोबरं सुरक्षितपणे खाऊ शकतात.
advertisement
7/9
कसं खाणं ठरेल फायदेशीर?भाज्या किंवा सॅलडमध्ये: खोबरं किसून ते भाज्यांवर किंवा सॅलडमध्ये घालून खाणे सर्वात उत्तम.चटणीच्या स्वरूपात: ओल्या नारळाची चटणी इतर लो-जीआय पदार्थांसोबत खाता येते.
advertisement
8/9
पण गोड पदार्थ टाळा: नारळाच्या वड्या, बर्फी किंवा साखर घातलेले पदार्थ मधुमेहींनी पूर्णपणे टाळावेत.आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यानंतर रक्तातील साखरेची तपासणी करून पहा, जेणेकरून तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते हे तुम्हाला समजेल.
advertisement
9/9
थोडक्यात सांगायचे तर, मधुमेही व्यक्तींना नारळ निषिद्ध नाही. मात्र, तो 'औषधासारखा' मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदेच जास्त मिळतात. प्रक्रिया केलेले स्नॅक्स खाण्यापेक्षा नैसर्गिक नारळाचा तुकडा खाणे हा कधीही आरोग्यदायी पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
ओलं खोबरं खाल्ल्याने शुगर वाढते का? मधुमेही रुग्णांच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं