TRENDING:

म्युझिक थेरपीनं रुग्णांवर उपचार करतो शिक्षक, 17 वर्षांपासून देतोय विनामूल्य सेवा PHOTOS

Last Updated:
कोल्हापुरातील एक शिक्षक गेली 17 वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांवर संगीताद्वारे उपचार करत आहे. आजवर कित्येक कोमामध्ये गेलेल्या रुग्णांना देखील त्यांनी या संगीताच्या माध्यमातून बाहेर येण्यास मदत केलीय.
advertisement
1/7
म्युझिक थेरपीनं रुग्णांवर उपचार करतो शिक्षक,17 वर्षांपासून देतोय विनामूल्य सेवा
संगीत हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. संगीताविना मनुष्याचे आयुष्य निरस होऊन जाईल. या संगीतात फक्त माणसालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक घटकाला नवचेतना देण्याची ताकद आहे. संगीतातील हीच ताकद ओळखून <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> एक शिक्षक गेली 17 वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांवर संगीताद्वारे उपचार करत आहे. आजवर कित्येक कोमामध्ये गेलेल्या रुग्णांना देखील त्यांनी या संगीताच्या माध्यमातून बाहेर येण्यास मदत केलीय. विशेष म्हणजे हे संगीत उपचार सर्व विनामूल्य ते आजतागायत करत आहेत.
advertisement
2/7
म्युझिक थेरपी ही प्रत्येक आजारातील मेडिकल फिल्डची सहाय्यक उपचार पद्धती मानली जाऊ शकते. त्यानुसारच संगीताचा वापर करून रुग्ण बरे करण्याची ही उपचार पद्धती कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरात राहणाऱ्या सचिन जगताप यांनी 17 वर्षांपूर्वी आत्मसात केली होती. स्वतः महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना देखील संगीताच्या आवडीमुळेच कित्येक रुग्णांना ते संगीत उपचाराची सेवा विनामूल्य देत आहेत. त्याचबरोबर एक उत्कृष्ट बासरीवादक म्हणून देखील ते कार्यरत आहेत.
advertisement
3/7
फक्त एक बासरीवादक असून बासरीवादनाचे क्लासेस सचिन जगताप घेत होते. तर डॉ. शितल देशपांडे यांच्यामुळे पहिल्यांदा त्यांनी संगीत चिकित्सा द्यायला सुरुवात केली होती. एक शिक्षक असल्याने संशोधन कार्यप्रणालीचे ज्ञान आहे. त्यामुळेच विविध साहित्य समीक्षा करून अशी संगीत चिकित्सा द्यायला सुरुवात केली.
advertisement
4/7
बाहेरच्या देशात या अशा उपचार पद्धतींमध्ये त्यांच्या प्रचलित संगीताचा वापर केला जातो. मात्र आपल्या देशात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा वापर करून मी पहिल्यांदा एका कोमामधील रुग्णाला बरे केले. त्यानंतर मी आयुर्वेदाचे सहकार्य घेऊन या संगीत उपचार पद्धतीचा अधिक अभ्यास केला. पुढे आजतागायत विविध नवनव्या व्याधींवर संगीताच्या माध्यमातून उपचार करत आलो असल्याचे सचिन जगताप यांनी सांगितले.
advertisement
5/7
संगीत उपचार घेतलेला प्रत्येक रुग्ण हा वेगळ्या त्रासाने ग्रस्त होता. आजतागायत 23 कोमा स्थितीत असलेले रुग्ण तसेच मधुमेह, कमी रक्तदाब, उच्च रक्तदाब, मोबाईलच्या आहारी गेलेले मानसिक रुग्ण असे विविध आजारांनी ग्रस्त 450 हून अधिक रुग्णांना या संगीत चिकित्सा देऊन बरे केले आहे. रुग्णांवर उपचार करताना भारतीय शास्त्रीय संगीतातील काही वेळा त्या रुग्णासाठी खास बनवून दिलेले संगीत, तर काहींसाठी तयार संगीत वापरत आलो आहे. तसेच रुग्णांना उपचारासाठी कोणत्याही पद्धतीची फी मी घेत नाही, असेही सचिन जगताप यांनी सांगितले.
advertisement
6/7
सचिन जगताप यांनी त्यांचे गुरू पं. हरिश्चंद्र कोकरे यांच्याकडे बासरीचे शिक्षण घेतले आहे. तर पं. नित्यानंद हळदीपूर यांच्याकडे सचिन यांचे शिक्षण चालू आहे. बासरीच्या थेट अलंकार परीक्षेत भारतातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान देखील यांनी पटकावला आहे. तसेच हार्मोनियमध्ये एम. ए. मुझिक आणि आकाशवाणीची बी हाय ग्रेड अशा पदव्या देखील त्यांनी प्राप्त केल्या आहेत. तर सध्या संगीतामध्ये पीएचडी करत असून अजूनही संगीताचा अभ्यास सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.
advertisement
7/7
कोणताही आजार हा फक्त औषधांनी नाही तर अंतर्मनातील सकारात्मक विचारांमुळे बरा होत असतो. हीच भावना मनामध्ये जागृत ठेवण्यासाठी या संगीत उपचार पद्धतीचा कित्येक असाध्य आजारांमध्ये ही वापर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या संगीत उपचार पद्धतीची स्वतःसाठी ओळख करून घेणे गरजेचे आहे, असे मतही जगताप यांनी व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
म्युझिक थेरपीनं रुग्णांवर उपचार करतो शिक्षक, 17 वर्षांपासून देतोय विनामूल्य सेवा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल