6 तासांपेक्षा कमी झोपता? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Dangers of sleeping less than 6 hours : 6 तासांपेक्षा कमी झोप घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, स्मरणशक्ती कमजोर होते आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. सतत कमी झोप घेतल्याने मानसिक तणाव, लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो. निरोगी जीवनासाठी दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.
advertisement
1/9

जर तुम्ही नियमितपणे सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपत असाल आणि कमी झोपूनही तुम्हाला पुरेशी झोप मिळते असं वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, खरं तर तुमच्या शरीराने कमी झोपेशी जुळवून घेतलं असलं, तरी त्याचा नकारात्मक परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत आहे.
advertisement
2/9
पुरेशी झोप न मिळाल्याचा आरोग्यावर परिणाम : आजकालच्या व्यस्त जीवनात, लोकं अनेकदा 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोपून आपलं काम आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. पुरेशी झोप न मिळाल्याचा मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो, ज्याकडे लोकं अनेकदा दुर्लक्ष करतात.
advertisement
3/9
मेंदूवर थेट परिणाम : कमी झोपल्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो. तुम्हाला दिवसभर सुस्त वाटतं, ऊर्जा कमी जाणवते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
advertisement
4/9
स्मरणशक्ती कमजोर होते : यामुळे स्मरणशक्ती कमजोर होते, नवीन गोष्टी शिकणं कठीण होतं आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये धोका पत्करण्याची प्रवृत्ती वाढू शकते, ज्यामुळे अपघात आणि चुका होण्याची शक्यता वाढते.
advertisement
5/9
मूडवर परिणाम : झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम व्यक्तीच्या मूडवर होतो. कमी झोपल्यामुळे चिडचिड, अस्वस्थता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येऊ शकते. दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
advertisement
6/9
थकवा जाणवतो : पुरेशी झोप न मिळालेल्या लोकांना अनेकदा थकवा आणि अस्वस्थ वाटतं. तसेच, यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते आणि जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
7/9
खेळाडूंसाठी धोकादायक : दिवसभर काम करणाऱ्या किंवा खेळ खेळणाऱ्या लोकांसाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. कमी झोपल्यामुळे शरीराची प्रतिक्रिया मंदावते, ज्यामुळे खेळाच्या कामगिरीवर परिणाम होतो. खेळाडूंना ऊर्जा कमी जाणवू शकते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
advertisement
8/9
गंभीर आजारांचा धोका : सतत कमी झोपल्यामुळे लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रोक आणि मेटाबोलिक सिंड्रोम यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
advertisement
9/9
मुलांवर वेगळा परिणाम : झोपेच्या कमतरतेचा मुलांवर वेगळा परिणाम होऊ शकतो. ते अधिक चिडखोर आणि अतिसक्रिय होऊ शकतात. तसेच, शाळेत लक्ष केंद्रित करण्यात अडचण, मूड स्विंग आणि राग वाढणे दिसून येऊ शकते. त्यामुळे, तुम्हाला निरोगी जीवन हवं असेल, तर तुमच्या झोपेशी तडजोड करू नका आणि किमान 7-8 तास झोप घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
6 तासांपेक्षा कमी झोपता? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!