TRENDING:

उन्हाळ्यात भाजी खावी तर 'ही'च! डायबिटीज, बीपी, शुगर, मूतखड्यावर पडते भारी

Last Updated:
विविध ऋतूंमध्ये बाजारात विविध भाज्या पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही बाजारपेठा हिरव्यागार भाज्यांनी सजतात. त्यात एक लहानशी भाजी अशी असते जी आपण कच्चीही खाऊ शकतो आणि शिजवूनही. कशीही खाल्ली तरी या भाजीतून शरीराला विशेष पोषक तत्त्व मिळतात. ही भाजी नेमकी कोणती आहे, पाहूया. (सौरभ, प्रतिनिधी / रायबरेली)
advertisement
1/5
उन्हाळ्यात भाजी खावी तर 'ही'च! डायबिटीज, बीपी, शुगर, मूतखड्यावर पडते भारी
तोंडलीत व्हिटॅमिन सी, बी, केसह फायबर, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, अँटि-इंफ्लेमेटरी, अँटि-बॅक्टेरियल आणि अँटि-ऑक्सिडंट गुणधर्म भरभरून असतात. यातून शरीराला विविध फायदे मिळतात. डॉ. स्मिता श्रीवास्तव यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 
advertisement
2/5
डॉक्टरांनी सांगितलं की, तोंडलीमुळे डायबिटीज नियंत्रित राहू शकतं. पचनसंस्था उत्तम राहू शकते. तसंच वजन कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयरोग आणि ब्लड प्रेशरबाबत काही त्रास असेल तर त्यातही तोंडली लाभदायी ठरते. 
advertisement
3/5
डॉक्टर सांगतात की, तोंडली खाल्ल्यानं किडनी स्टोन अर्थात मूतखड्यावर आराम मिळू शकतो. तसंच यात असलेल्या अँटी-हायपरग्लायसेमिक तत्त्वामुळे रक्तातली साखर नियंत्रित राहू शकते. विशेषत: तोंडलीतून उन्हाळ्यात शरीराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळतात. 
advertisement
4/5
तोंडली अति शिजवू नये. ताजी आणि कच्ची तोंडली खाणं जास्त फायदेशीर असतं. तसंच जर तोंडली योग्य पद्धतीनं शिजवली गेली असेल तरी त्यातले पोषक तत्त्व पुरेपूर शरीराला मिळतात. 
advertisement
5/5
कोणत्याही ऋतूत आहार अगदी सकस असायला हवा. त्यात उन्हाळ्यात तर आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. तोंडलीसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात करावा. त्यामुळे शरीर सुदृढ आणि ऊर्जावान राहतं. उन्हाळ्यात आजारपण शरीरापासून दूर ठेवण्यासाठी तोंडली फायदेशीर ठरते. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात भाजी खावी तर 'ही'च! डायबिटीज, बीपी, शुगर, मूतखड्यावर पडते भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल