तळव्यांमध्ये होते असह्य जळजळ? करा सोपे उपाय, थंड वाटेल, नसांना आराम मिळेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Foot Care Tips: सकाळी झोपेतून उठल्यावर कधी तुमच्या तळव्यांमध्ये असह्य जळजळ होते का? यामागे विविध कारणं असू शकतात. कारण काहीही असलं तरी या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, हा एखाद्या आजाराचा किंवा शारीरिक असुंतलनाचा संकेत असू शकतो. (आदर्श, प्रतिनिधी / देहरादून)
advertisement
1/7

शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता असेल, युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल किंवा डिहायड्रेशन झालं असेल तर तळव्यांमध्ये जळजळ होऊ शकते. आज आपण यावर असे काही उपाय पाहणार आहोत ज्यांमुळे अगदी मूळांपासून आराम मिळू शकेल.
advertisement
2/7
शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास तळव्यांमध्ये जळजळ होऊ शकते. तसंच रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तरीही हा त्रास होऊ शकतो. जर आपण सहन न होणाऱ्या चप्पला वापरत असाल तरीदेखील तळव्यांमध्ये जळजळ होऊ शकते. परंतु काळजी करू नका, यावर काही घरगुती रामबाण उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत.
advertisement
3/7
तळव्यांना आराम मिळावा यासाठी देशी गायीचं तूप अतिशय फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुपात हळद मिसळून हलक्या हातानं मालिश करावी. यामुळे शरीराला गारवा मिळतो आणि तळव्यांमधील नसा शांत होतात. झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यानं चांगला आराम मिळू शकतो.
advertisement
4/7
कोरफड गर आणि नारळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतं. दोन्ही मिसळून पायांना लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जळजळ शांत होते आणि थंड वाटतं. कोरफडात असलेल्या अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे नसांना आराम मिळतो.
advertisement
5/7
दररोज त्रिफळा चुर्ण पाण्यात मिसळून रात्रभर भिजवावं. सकाळी या पाण्यानं पाय धुवावे. यामुळे पायांची जळजळ कमी होते आणि टॉक्सिन्स बाहेर निघतात. चंदन पावडरमध्ये अनेक चमत्कारी गुणधर्म असतात. त्यात गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट तळव्यांवर लावावी. त्यामुळे शरीरातील उब कमी होऊ शकते आणि थंड वाटू शकतं. जवळपास 10-15 मिनिटं ही पेस्ट लावून मग थंड पाण्यानं धुवून घ्यावं.
advertisement
6/7
धण्यांमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी हे पाणी प्यायल्यानं शरीरातील उब संतुलित राहते आणि जळजळ कमी होते. हा उपाय विशेषत: पित्तदोष शांत करण्यास प्रभावी ठरतो.
advertisement
7/7
आयुर्वेदात दिलेल्या या उपायांमुळे केवळ तळव्यांची जळजळ दूर होत नाही, तर संपूर्ण शरीर सुदृढ राहण्यासही मदत मिळते. नियमितपणे हे उपाय केल्यानं शरीर ऊर्जावान राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
तळव्यांमध्ये होते असह्य जळजळ? करा सोपे उपाय, थंड वाटेल, नसांना आराम मिळेल!