मधुमेहासाठी उपायकारक जायफळ; रोज सकाळी 'या' पद्धतीनं करा सेवन, होईल फायदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गरम मसालामध्ये वापरले जाणारे जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं.
advertisement
1/7

आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाल्याचे पदार्थ हे आपल्या पदार्थांचे सहभागृहच पण त्यासोबत ते आपल्यासाठी फायदेशीर देखील असतात. गरम मसालामध्ये वापरले जाणारे जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. जायफळ खाण्याचे आपल्याला काय काय फायदे होतात याविषयी <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगरमधील</a> आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/7
जायफळाच्या थोड्याशा सेवनाने आठ ते दहा प्रकारच्या व्याधी या बऱ्या होतात. जायफळामध्ये खनिजे जास्त असतात. या खनिजांमध्ये मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतं. ते आपल्या शरीरासाठी चांगल असतं.
advertisement
3/7
आपण प्रत्येक जण पुरण केले की त्यामध्ये जायफळ टाकत असतो त्याचं कारण असं की हरभऱ्याची डाळ असते. त्याच्यामध्ये दाह मोठ्या प्रमाणात असतो हा दाह कमी करण्यासाठी जायफळ टाकल्याने कमी होतो, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
4/7
रक्तवाहिना वरील ताण कमी करण्यासाठी जायफळाचा वापर हा केला जातो. ज्यांना मधुमेह आहे अशांनी जर रोज सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक कप पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये जायफळची पावडर किंवा उगाळून जर ते पाणी घेतलं तर त्यामुळे इन्सुलिनची क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते.
advertisement
5/7
जायफळाचे मात्रा योग्य प्रमाणात पाहिजे. ज्यांना हृदयविकार आहेत आणि त्यांचे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे अशांनी जर जायफळाचे पावडर आणि दालचिनीची पावडर एकत्र करून त्याचे सेवन केले तर हृदयावरील आणि रक्तवाहिन्यावरील ताण कमी होण्यास मदत होते.
advertisement
6/7
ज्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत चेहरा डॉल झालेला आहे कोणते डाग आहेत अशांनी जायफळ दारू चेहऱ्यावरती लावावे नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावे. सगळे पिंपल्स आणि डाग जायला मदत होते.
advertisement
7/7
झोप लागत नसेल, खूप ताण असेल तसेच खूप अभ्यास करायच असेल तर दुधामध्ये थोडसं जायफळ घेतले तर तुमचे हे सर्व ताण जातात. ज्यांना अॅसिडिटी आहे त्यांनी सुद्धा दुधामध्ये जायफळ टाकून घेतलं तर मदत होते. त्याचा सोबत जर ज्यांना युरीन साफ होत नसेल यांनी पण जायफळ घायलाला पाहिजे, असंही अलका कर्णिक सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
मधुमेहासाठी उपायकारक जायफळ; रोज सकाळी 'या' पद्धतीनं करा सेवन, होईल फायदा