TRENDING:

शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS

Last Updated:
निरोगी राहण्यासाठी आपण दररोज आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
advertisement
1/6
शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS
आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी प्रथिने हे आवश्यक असतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपण दररोज आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आहारामध्ये सुमारे 15 ते 35 टक्के प्रथिने असले पाहिजेत. प्रथिनांपासून शरीराला भरपूर अमिनो अ‍ॅसिड्स मिळतात.
advertisement
2/6
शरीराची वाढ आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपली सर्व दैनंदिन कामे करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. सामान्यतः लोक मांसाहाराला प्रोटीनसाठी चांगले मानतात, यात खरच तथ्य आहे का? याची माहिती <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातल्या</a> डॉक्टर प्रणिता अशोक यांनी दिली आहे.
advertisement
3/6
चिकन किंवा फिश खाल्लं नाही तर प्रोटीन मिळत नाही हा लोकांचा गैरसमज आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर दही, पनीर, कडधान्ये आणि काही फळे आणि भाज्या प्रथिनांची कमतरता पूर्ण करू शकतात, असं त्यांनी सांगितलं. गव्हामध्ये 10 टक्के तर सोयाबीनमध्ये 40 ते 45 टक्के प्रोटिन्स आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
4/6
प्रोटीन पावडर किंवा वे प्रोटीनची गरज प्रत्येकाला नसतं. रोज दोन-दोन तास व्यायाम करणाऱ्यांना जास्त एनर्जी लागते. त्यावेळी त्यांना प्रोटीनची गरज जास्त लागते. त्यांनीच हे पावडर घ्यावं. रोज साधारण व्यायाम तसंच तासभर चालणं किंवा दहा मिनिटं जॉगिंग करणाऱ्यांना प्रोटीन डोसची गरज नसते. रोजच्या आहारातून जी प्रोटीन मिळतात तीच पुरेशी असतात.
advertisement
5/6
तुम्ही रोजच्या आहारात कडधान्य, उसळीचा वापर करा. पनीर खा, तुमच्या शरिरात योग्य प्रमाणात प्रोटीन्स असेल, असं डॉ. प्रणिता अशोक यांनी स्पष्ट केलं.
advertisement
6/6
(टीप : या बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल