TRENDING:

Skin Care Tips : उन्हाळ्यामध्ये काळपट अन् पांढऱ्या डागाचे टेन्शन सोडा, त्वचा राहील एकदम क्लीन, हा उपाय करा!

Last Updated:
दैनंदिन आहार जेव्हा आपण घेतो, तेव्हा त्यात काही महत्त्वाच्या व्हिटॅमिनचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहरा चमकदार दिसतो आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
advertisement
1/7
काळपट अन् पांढऱ्या डागाचे टेन्शन सोडा, त्वचा राहील एकदम क्लीन, हा उपाय करा!
उन्हाळ्यामध्ये अनेक वेळा त्वचा काळी पडते. त्याचबरोबर त्वचेवर काळपट डाग पडल्यासारखे दिसतात. काही वेळा पांढरे डाग सुद्धा पडतात. डोळ्याखाली काळे वर्तुळ येतात. या सर्व समस्या निर्माण होण्याची कारणे म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता.
advertisement
2/7
दैनंदिन आहार जेव्हा आपण घेतो, तेव्हा त्यात काही महत्त्वाच्या व्हिटॅमिनचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहरा चमकदार दिसतो आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. दररोजच्या आहारात कोणकोणते व्हिटॅमिन असायला पाहिजेत? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
3/7
आपण दररोज आहार घेतो त्यात व्हिटॅमिन असणे अत्यंत आवश्यक असते. कारण आपल्या खानपानावरच आपले आरोग्य अवलंबून असते. तर मग व्हिटॅमिनसाठी आहारात कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत? तर सकाळी उठल्यानंतर टोमॅटो ज्यूस, बीट रूट, लिंबू पाणी याचा समावेश तुम्ही करू शकता. यामुळे चेहरा सतेज होतो आणि चेहऱ्यावरील काळे डाग सुद्धा हळूहळू जायला लागतात, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
advertisement
4/7
त्यानंतर जेवणामध्ये मोड आलेले कडधान्य, गाजर, मुळा, बीट याचा समावेश करायला पाहिजे. यामुळे सुद्धा आपण आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ सुद्धा आहारात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
5/7
तर यामध्ये येतात सिजनेबल फळ. संत्रा, मोसंबी, केळी, टरबूज, खरबूज यासारखे फळ तुम्ही घेऊ शकता. एकदम महागडी फळ घेण्याची गरज नाही. आहारात फळांचा समावेश असल्यास सुद्धा चेहरा सतेज होण्यास मदत होते.
advertisement
6/7
त्यानंतर अनेकांना डोळ्याखाली काळे वर्तुळ येतात. तर ते व्हिटॅमिन बी 12 च्या आणि आयरनच्या कमतरतेमुळे होतात. त्यासाठी आहारात खजूर, शेवग्याच्या शेंगा, पालक अशा गोष्टींचा समावेश करायला पाहिजे.
advertisement
7/7
त्याचबरोबर मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासर्व गोष्टी बघणे कमी करायला पाहिजे. त्यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असेही डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips : उन्हाळ्यामध्ये काळपट अन् पांढऱ्या डागाचे टेन्शन सोडा, त्वचा राहील एकदम क्लीन, हा उपाय करा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल