TRENDING:

स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी मुंबईतले 5 फेमस स्ट्रीट मार्केट

Last Updated:
मुंबई दुरून खूप महागडी, हाय-फाय आणि पॉश दिसत असली तरी येथील रस्त्यावरील बाजारपेठ त्यांच्या परवडणाऱ्या खरेदीसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. येथे तुम्हाला फॅशनेबल आणि ऑन-ट्रेंड कपड्यांपासून पादत्राणे, ॲक्सेसरीज आणि घराच्या सजावटीपर्यंत सर्व काही मिळेल. तुमच्यातील शॉपिंगचे समाधान करण्यासाठी, कुलाबा कॉजवे, क्रॉफर्ड मार्केट आणि हिल रोड वांद्रे यासह मुंबईतील य
advertisement
1/6
स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी मुंबईतले 5 फेमस स्ट्रीट मार्केट
मुंबई दुरून खूप महागडी, हाय-फाय आणि पॉश दिसत असली तरी येथील रस्त्यावरील बाजारपेठ परवडणाऱ्या खरेदीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला फॅशनेबल आणि ऑन-ट्रेंड कपड्यांपासून पादत्राणे, ॲक्सेसरीज आणि घराच्या सजावटीपर्यंत सर्व काही मिळेल. तुमच्यातील शॉपिंगचे समाधान करण्यासाठी, कुलाबा कॉजवे, क्रॉफर्ड मार्केट आणि हिल रोड वांद्रे यासह मुंबईतील या 5 स्ट्रीट मार्केटला भेट द्यायला पाहिजे.
advertisement
2/6
कोलाबा येथील कोलाबा कॉज़वे या बाजारात ट्रेंडी कपडे, रंगीबेरंगी दागिने आणि प्राचीन घड्याळांपासून पितळी ट्रिंकेट्स, बॅकपॅक आणि फॅशनेबल फुटवेअरपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. शहरातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट मार्केटपैकी हे एक असून सहसा पर्यटकांनी खचाखच भरलेले असते. त्यात बॉम्बे इलेक्ट्रिक आणि बंगला 8 सारखे उच्च दर्जाचे बुटीक देखील आहेत. चवदार जेवणासाठी तुम्ही बगदादी, बडेमिया किंवा लाइट ऑफ एशियासारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही जाऊ शकता.
advertisement
3/6
हिल रोड मार्केट हे वांद्रे पश्चिम मुंबई येथे आहे. या स्ट्रीट मार्केटमध्ये पादत्राणे, हाय-स्ट्रीट शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्स आहेत. ज्यामुळे ते रस्त्यावर खरेदीसाठी एक योग्य ठिकाण बनले आहे. वांद्रे लोकल स्टेशनजवळ हा एक लांबलचक रस्ता आहे, येथे खरेदी करण्यासाठी, विक्रेत्यांशी सौदा कसा करावा हे माहित असले पाहिजे.
advertisement
4/6
मुंबईच्या प्रवासादरम्यान तुम्ही प्रसिद्ध लोखंडवाला मार्केट चुकवू शकत नाही. अंधेरी जवळ स्थित, हे एक भव्य आणि आलिशान स्ट्रीट मार्केट आहे. जिथे तुम्ही कधीही एखाद्या सेलिब्रिटीला भेटू शकता. या मार्केटमध्ये ब्रँडेड स्टोअर्स, रस्त्यावर विक्रेते, कॅफे आणि निवासी इमारतींनी भरलेले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँड्स येथे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात.
advertisement
5/6
मुंबईतील लिंकिंग रोड बांद्रा हे तुमचे पहिले आणि आवडते स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन असायला हवे. स्वस्त आणि फॅशनेबल कपडे, दागिने, पादत्राणे येथे उपलब्ध आहेत. हे ठिकाण मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट मार्केट आहे. येथे अनेक लक्झरी ब्रँडची दुकाने आणि बुटीक देखील आहेत, त्यामुळे काही प्रसिद्ध बुटीक आणि डिझायनर स्टुडिओ पाहण्यासाठी येथे फेरफटका मारू शकता.
advertisement
6/6
दक्षिण मुंबईत असलेला क्रॉफर्ड स्ट्रीट मार्केट 150 वर्षांहून अधिक जुन आहे. त्यामुळे ते शहरातील सर्वात जुने मार्केट मध्ये येतं. जरी हे ठिकाण गजबजलेले आणि पारंपारिक असले तरी ते कपडे आणि इतर फॅशनेबल गोष्टींसाठी लोकप्रिय नाही. पण कमी किमतीत तुम्हाला फॅन्सी होम डेकोर ॲक्सेसरीज आणि लाइफस्टाइल वस्तू नक्कीच मिळू शकतात. तुम्ही कधी या रस्त्यावरच्या बाजारात गेला आहात का? नसेल गेलात तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी मुंबईतले 5 फेमस स्ट्रीट मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल