TRENDING:

Rose Day 2026 Special : जितके रंग तितकेच वेगळे अर्थ! आजच्या खास दिवशी कोणाला कोणता गुलाब द्याल?

Last Updated:
Different color roses and their meaning : प्रेम व्यक्त करायची वेळ आली किंवा तसं प्लॅनिंग सुरु असेल तर आधी विषय येतो, गुलाबाचा. प्रेम म्हणलं की गुलाब आलंच. व्हॅलेंटाईन विकमध्येही या गुलाबाला खूप मागणी असते. मात्र गुलाब एकाच रंगाचा नसतो. म्हणून जेवढे गुलाबाचे रंग तेवढे वेगवेगळे त्याचे अर्थ. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच खास माहिती देत आहोत.
advertisement
1/7
जितके रंग तितकेच वेगळे अर्थ! आजच्या खास दिवशी कोणाला कोणता गुलाब द्याल?
लाल गुलाब : याचा अर्थ सर्वांना माहीतच आहे. लाल गुलाब देणे म्हणजे हे घोषित आणि मान्य करणे की आपले समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रपोज करण्यासाठी आणि व्यक्तीला आयुष्यभराची साथ मागण्यासाठी लाल गुलाब दिला जातो.
advertisement
2/7
पांढरा गुलाब : आपल्याला कुणीतरी मनोमन आवडू लागले असेल आणि तुम्हाला याबद्दल त्यांना हलका इशारा द्यायचा द्यायचा असेल तर पांढरा गुलाब द्यावा. पांढरा गुलाब रोमँटिक आकर्षण दाखवण्यासाठी बेस्ट आहेत.
advertisement
3/7
गुलाबी गुलाब : एखादी यक्ती तुमच्या आयुष्यात असेल आणिनट्यांच्या सोबत खूप आनंदी असाल तर समोरच्या व्यक्तीलाही ते सांगणं आवश्यक असतं. मिळालेल्या प्रेमामुळे तुम्ही किती सुखी आणि भाग्यवान झाला आहात हे व्यक्त करण्यासाठी गुलाबी गुलाब वापरला जातो.
advertisement
4/7
पिवळा गुलाब : पिवळा गुलाब मैत्री आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. हा गुलाब फक्त मित्रमैत्रिणींनाच द्यावा असे नाही. तुमची प्रेयसी/प्रियकर किंवा नवरा/बायको हेही तुमचे पहिले आणि चांगले मित्र असू शकतात. त्यामुळे त्यांनाही तुम्ही या गुलाब देऊ शकतात.
advertisement
5/7
केशरी गुलाब : केशरी गुलाब तुमच्या नात्यातील इंटेन्सिटी आणि उत्साह दाखवण्यासाठी वापरला जातो. तुम्ही दोघे एकमेकांकडे आकर्षित होता आणि तीव्रतेने एकमेकांच्या जीवनाचा भाग बनू इच्छिता. हे या गुलाबातून कळते. तुमचं नातं एक पाऊल पुढे नेण्यासाठी हे गुलाब देऊन तुम्ही सुरुवात करू शकता.
advertisement
6/7
निळा गुलाब : निळा गुलाब स्वतःच खूप दुर्मिळ आहे. म्हणून तुमच्या आयुष्यातील अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी खूप खास आहे तिला हा गुलाब द्यावा. हा गुलाब दाखवतो की, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात अतिशय खास आणि अद्वितीय आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rose Day 2026 Special : जितके रंग तितकेच वेगळे अर्थ! आजच्या खास दिवशी कोणाला कोणता गुलाब द्याल?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल