River : भारतातील सर्वात लहान नदी कोणती? तुमचं GK Strong असेल तर द्या उत्तर, 99 टक्के लोकांना हे माहितच नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पूर्णपणे कोरडी पडलेली, नकाशावरून पुसली गेलेली एक नदी केवळ सामान्य माणसांच्या जिद्दीमुळे पुन्हा खळाळून वाहू लागली, तर तुमचा विश्वास बसेल का?
advertisement
1/8

पाणी म्हणजे जीवन. आपण सर्वच जण हे वाक्य ऐकत मोठे झालो आहोत. पण आजच्या काळात जेव्हा नद्या प्रदूषित होत आहेत किंवा कोरड्या पडत आहेत, तेव्हा मनामध्ये एक भीती दाटून येते की पुढच्या पिढीला पिण्यासाठी पाणी तरी मिळेल का? पण, जर मी तुम्हाला सांगितलं की, पूर्णपणे कोरडी पडलेली, नकाशावरून पुसली गेलेली एक नदी केवळ सामान्य माणसांच्या जिद्दीमुळे पुन्हा खळाळून वाहू लागली, तर तुमचा विश्वास बसेल का?
advertisement
2/8
हो, हे खरं आहे, ही गोष्ट आहे राजस्थानच्या वाळवंटातील अरवरी नदीची. ही केवळ भारताची सर्वात छोटी नदी नाही, तर ती मानवी इच्छाशक्तीचं एक जिवंत प्रतीक आहे. चला तर मग, जाणून घेऊया या नदी पूर्णपणे संपूण गेली असताना तिचा पुनर्जन्म कसा झाला.
advertisement
3/8
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात वाहणारी अरवरी नदी अवघ्या 90 किलोमीटर लांबीची आहे. अरवली पर्वत रांगांच्या अर्ध-शुष्क भागातून उगम पावणारी ही नदी 70 हून अधिक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा मुख्य आधार आहे. थाणागाजी जवळ उगम पावल्यानंतर ही नदी पुढे जाऊन साहिबी नदीला मिळते.
advertisement
4/8
1980 आणि 90 च्या दशकात परिस्थिती अतिशय भीषण होती. पावसाच्या कमतरतेमुळे आणि पाण्याचा अतिवापर झाल्यामुळे अरवरी नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. नद्यांचे पात्र केवळ धुळीने भरले होते. यामुळे गावातील लोकांचे स्थलांतर वाढले, शेती नष्ट झाली आणि वन्यजीवांचे हाल होऊ लागले.
advertisement
5/8
1995 मध्ये या भागाचं नशीब बदललं. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह आणि तरूण भारत संघ या संस्थेने गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी सरकारकडे हात न पसरता स्वतःच्या हाताने पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी 300 हून अधिक मातीचे छोटे बंधारे बांधले.
advertisement
6/8
परिणाम काय झाला?पावसाचे पाणी जमिनीत जिरू लागले आणि हळूहळू जमिनीतले पाण्याचे झरे पुन्हा जिवंत झाले. जी नदी पूर्णपणे सुकली होती, ती आता बाराही महिने खळाळून वाहू लागली आहे.
advertisement
7/8
या नदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं व्यवस्थापन! गावकऱ्यांनी मिळून 'अरवरी संसद' स्थापन केली आहे. या नदीच्या पाण्याचा वापर कसा करायचा, कोणती पिके घ्यायची आणि नदीचे प्रदूषण कसे रोखायचे, याचे सर्व निर्णय ही संसद घेते. स्थानिक पातळीवर जल व्यवस्थापन कसे असावे, याचे हे जगातले उत्तम उदाहरण मानले जाते.
advertisement
8/8
आज अरवरी नदीच्या काठावर केवळ हिरवीगार शेतीच दिसत नाही, तर तिथे आता हरणं, मोर आणि अनेक प्रकारचे पक्षी आनंदाने वावरताना दिसतात. वाळवंटाच्या भागात जिथे जगणं कठीण होतं, तिथे आता आनंदी आणि समृद्ध आयुष्य नांदत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
River : भारतातील सर्वात लहान नदी कोणती? तुमचं GK Strong असेल तर द्या उत्तर, 99 टक्के लोकांना हे माहितच नसेल