Panchayat Samiti Election khed: पहिलं कर्तव्य, मग लग्न! बोहल्यावर चढण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क; खेडच्या रेश्माची तुफान चर्चा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Panchayat Samiti Election khed: जामगे गावातील रेश्मा नरळकर हिने लग्नाआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. तिच्या या जागरूकतेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
advertisement
1/6

खेड, प्रतिनिधी चंद्रकांत बनकर: अंगाला हळद लागलेली, अंगावर हिरवीगार साडी, हातात हिरवा चुडा आणि डोक्यावर काही क्षणात चढणारं बाशिंग... लग्नाच्या मंडपात न जाता नवरी थेट शाळेत पाहोचली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या 'जामगे' गावात आज एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्यापूर्वी रेश्मा नरळकर या तरुणीने थेट मतदानाचा केंद्र गाठलं आणि मतदान केलं.
advertisement
2/6
रत्नागिरी जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उत्साहात मतदान सुरू आहे. याच धामधुमीत जामगे येथील रेश्मा नरळकर हिचं लग्न होतं. लग्नाची वेळ जवळ येत असताना आणि घरी पाहुण्यांची लगबग सुरू असताना रेश्माने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
3/6
"लग्नाचं मंगलाष्टक होण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावायला हवं," याच विचाराने ती नटून थटून बोहोल्यावर चढण्याआधी थेट शाळेत पोहोचली. तिथे मतदान केंद्रावर तिने मतदान केलं आणि त्यानंतर लग्नासाठी उभी राहिली.
advertisement
4/6
प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. रांगेत उभे असलेल्या मतदारांनी आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनीही तिचं उत्स्फूर्त स्वागत केलं. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तिने हाताच्या बोटावरील शाई अभिमानाने दाखवली आणि त्यानंतरच ती लग्न मंडपाकडे रवाना झाली.
advertisement
5/6
अनेकदा आपण सुट्टी आहे म्हणून किंवा कामाचं कारण देऊन मतदान टाळतो. मात्र, आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणीही मतदानाचं महत्त्व न विसरणाऱ्या रेश्माने एक मोठा संदेश दिला आहे.
advertisement
6/6
"लग्न तर होणारच, पण माझं एक मत माझ्या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे," ही तिची भावना आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर या 'जागरूक नवरी'चे फोटो तुफान व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Panchayat Samiti Election khed: पहिलं कर्तव्य, मग लग्न! बोहल्यावर चढण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क; खेडच्या रेश्माची तुफान चर्चा