Mahashivratri 2026: आलेलं संकट महाशिवरात्रीला टळणार! कोणाला न सांगता या गोष्टींचे दान करणे 5 राशींना वरदान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri 2026: महाशिवरात्री उत्सव शंकर देवाची पूजा करण्यापुरता नसून कुंडलीतले जे कडक ग्रह असतात त्यांना शांत करण्याची ही लय मोठी संधी असते. 2026 ची महाशिवरात्री त्यांच्यासाठी संजीवनीच आहे, जे शनीच्या साडेसातीमुळे किंवा अडीचकीमुळे पार वैतागलेत. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, महादेव हे शनी देवाचे गुरू आहेत. शिवरात्रीला काही खास गोष्टी दान केल्या की शनीचा राग शांत होतो, आयुष्यात सुखाचे दिवस येतात.
advertisement
1/7

आजकाल सिंह आणि धनु राशीच्या मागे शनीची अडीचकी लागलीये, तर कुंभ, मीन आणि मेष राशीवर साडेसाती चालू आहे. तुमची रास यातील असेल, तर महाशिवरात्रीला 5 गोष्टींचे दान तुमचं नशीब पालटू शकतात.
advertisement
2/7
लोखंडाचं दान: शनिदेवाला लोखंड फार आवडतं. या दिवशी लोखंडी तवा, कढई किंवा एखादं हत्यार गरजू माणसाला दान करा. शनी तर शांत होतीलच, पण कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील.
advertisement
3/7
मोहरीचं तेल: साडेसातीचा त्रास कमी करायला मोहरीचं तेल एकदम भारी उपाय आहे. एका लोखंडी वाटीत तेल घ्या, त्यात स्वतःचा चेहरा बघा आणि मग ते तेल दान करून टाका. यामुळे कोर्टाची कामं होतात किंवा अपघाताची भीती कमी होते.
advertisement
4/7
काळे तीळ: शिवलिंगावर काळे तीळ तर वाहाच, पण त्या दिवशी तीळदान पण करा. शनी देव तर खुश होतातच, शिवाय पितृदोषातून सुटका मिळाल्याने घरात सुबत्ता येते.
advertisement
5/7
काळे कपडे: शिवरात्रीला काळ्या कपड्यांचं दान केल्याने शनीची वाईट नजर दूर होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कपडे शनिवारी विकत घेऊ नका, आधीच घेऊन ठेवा.
advertisement
6/7
छत्रीचं दान: ज्यांना लय टेन्शन असतं किंवा मन शांत नसतं, त्यांच्यासाठी छत्री दान करणं सगळ्यात बेस्ट आहे. जशी छत्री ऊन-पावसापासून वाचवते, तसंच हे दान तुम्हाला शनीच्या वाकड्या नजरेपासून वाचवेल.
advertisement
7/7
दान करताना मनातल्या मनात ॐ नमः शिवाय आणि ॐ शं शनैश्चराय नमः म्हणायला विसरू नका. महादेवांच्या शब्दाबाहेर शनी देव पण जात नाहीत, त्यामुळे या दिवशी शिवभक्तीच तुमची खरी ढाल आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahashivratri 2026: आलेलं संकट महाशिवरात्रीला टळणार! कोणाला न सांगता या गोष्टींचे दान करणे 5 राशींना वरदान