राजस्थान टॉपवर
राजस्थानच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. आयपीएलच्या या मोसमातला राजस्थानचा 3 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे, त्यामुळे 6 पॉईंट्ससह राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. तर 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एक सामना रद्द झालेली पंजाब 5 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आरसीबी आणि दिल्लीनेही त्यांचे 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यातही 4 पॉईंट्स आहेत. पण चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी तिसऱ्या तर दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. सनरायजर्स हैदराबादने 3 पैकी 1 सामना जिंकला असून दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. तर लखनऊने 2 पैकी एक आणि मुंबईने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे.
advertisement
मुंबई लखनऊच्याही मागे
हैदराबाद, लखनऊ आणि मुंबईच्या खात्यात प्रत्येकी 2-2 पॉईंट्स आहेत. पण मुंबईचा नेट रनरेट हा इतर दोन्ही टीमपेक्षा खराब आहे, त्यामुळे मुंबई सातव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मुंबईचा नेट रनरेट हा मायनस 0.715 आहे. हैदराबाद टेबलमध्ये पाचव्या आणि लखनऊ सहाव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई तळाला
केकेआरला या मोसमात एकही सामना जिंकता आलेला नाही, पण पंजाबविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने केकेआरच्या खात्यात फक्त एक पॉईंट आहे, त्यामुळे केकेआर आठव्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि चेन्नईला या मोसमात अजून एकही विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे शून्य पॉईंटसह दोन्ही टीम तळाला आहेत. गुजरात नवव्या आणि चेन्नई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.
