TRENDING:

Coconut Chatni Recipe : चटणीमुळे डोसा इडलीची चव बिघडते? मग 2 प्रकारे बनवा नारळाची चटणी, वाढेल स्वाद

Last Updated:
डोसा इडली सोबत नारळाची चटणी हे फारच अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. परंतू अनेकजणांना हे माहित नाही की नारळाची चटणी ही दोन प्रकारे केली जाऊ शकते. यामुळे डोसा इडलीचा स्वाद आणखीन वाढतो आणि खाणाऱ्या व्यक्तींना देखील व्हरायटी मिळते.
advertisement
1/4
चटणीमुळे डोसा इडलीची चव बिघडते? मग 2 प्रकारे बनवा नारळाची चटणी, वाढेल स्वाद
नारळाची चटणी बनवण्याची पहिली पद्धत आणि लागणारे साहित्य : 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धी वाटी दही, 2 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तडक्यासाठी मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता,
advertisement
2/4
नारळाची चटणी बनवण्याची पहिली पद्धत कृती : सर्वप्रथम ओल्या नारळाचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात ठेवा. तसेच लसूण, जिरे, कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची आणि दही घालून चांगले बारीक करा. आता हे एका भांड्यात काढून घ्या. नंतर यावर तडका देण्यासाठी कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम होताच मोहरी तडतडून घ्या. तसेच कढीपत्ता घाला आणि शेवटी लाल मिरचीचे दोन तुकडे टाका. गॅस बंद करा आणि या तडक्यामध्ये चटणी घाला. चविष्ट नारळाची चटणी तयार आहे.
advertisement
3/4
नारळाची चटणी बनवण्याची दुसरी पद्धत साहित्य : 1 वाटी ओले नारळ, 1 चमचा उडीद डाळ, 1  चमचा हरभरा डाळ,2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 2 पाकळ्या लसूण, तडक्यासाठी मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता
advertisement
4/4
नारळाची चटणी बनवण्याची दुसरी पद्धत कृती : सर्वप्रथम नारळ ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालून हलके तळून घ्या. गॅस बंद करून ही डाळ ग्राइंडरमध्ये टाका. तसेच हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ घालून चांगले बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट एका भांड्यात फिरवा. तडका बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. तसेच कढीपत्ता आणि लाल मिरची टाका आणि गॅस बंद करा. आता हा तडका चटणीवर ओतून गरमागरम सर्व्ह करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coconut Chatni Recipe : चटणीमुळे डोसा इडलीची चव बिघडते? मग 2 प्रकारे बनवा नारळाची चटणी, वाढेल स्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल